ब्युरो टीम : महाराष्ट्राच्या राजकारणातील अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत पुण्यातून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर नांदेडमधून वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे कोल्हापूरहून शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर नंदुरबारमध्ये गोवाल पाडवी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. काँग्रेसकडून महाराष्ट्रातील एकूण 7 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. उर्वरित उमेदवारांची घोषणा देखील लवकरच होण्याची शक्यता आहे. दरम्यान, काँग्रेस महाराष्ट्रात 48 पैकी एकूण 18 जागांवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील इतर पक्ष किती आणि कोणकोणत्या जागांवर लढणार? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महाराष्ट्रातील ‘या’ 7 उमेदवारांची नावे जाहीर
सोलापूर – प्रणिती शिंदे
कोल्हापूर – शाहू महाराज छत्रपती
पुणे – रवींद्र धंगेकर
नंदुरबार – गोवाल पाडवी
अमरावती – वळवंत वानखेडे
लातूर – डॉ. शिवाजी कलगे
नांदेड – वसंतराव चव्हाण
टिप्पणी पोस्ट करा