Cricket ; देवदत्त पडीक्कल याचं पदार्पणात कसोटी अर्धशतक; भारताचा डाव सावरला

 

ब्युरो टीम : टीम इंडियाचा युवा फलंदाज देवदत्त पडीक्कल याने आपल्या कसोटी कारकीर्दीतीची जोरदार सुरुवात केलीय. देवदत्तने इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या कसोटीतील दुसऱ्या दिवशी सिक्स ठोकून अर्धशतक झळकावलं आहे. देवदत्तने पदार्पणात अविस्मरणीय कामगिरी करत निर्णायक क्षणी टीम इंडियाचा डाव सावरण्यात मोठी भूमिका बजावली. तसेच दुसऱ्या दिवशी रोहित शर्मा आणि शुबमन गिल हे शतकवीर आऊट झाल्यानंतर देवदत्तने सरफराजसोबत टीम इंडियाचा डाव सावरला.

देवदत्त पडीक्कल याने 87 व्या ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर खणखणीत सिक्स खेचला आणि अर्धशतक पूर्ण केलं. देवदत्तने 83 बॉलमध्ये 8 चौकार आणि 1 सिक्सच्या मदतीने 61.45 च्या स्ट्राईक रेटने 51 धावा केल्या. देवदत्तकडून अर्धशतकानंतर मोठ्या खेळीची अपेक्षा होती. देवदत्त त्यानुसार पुढे जात होता. मात्र शोएब बशीर याने देवदत्तच्या खेळीला फुलस्टॉप लावला. बशीरने देवदत्तला क्लिन बोल्ड केलं. देवदत्तने 103 बॉलमध्ये 10 चौकार आणि 1 सिक्ससह 65 धावांची खेळी केली.

देवदत्त-सरफराजची निर्णायक भागीदारी

दुसऱ्या दिवशी कॅप्टन रोहित शर्मा आणि शुबमन गिल या दोघांनी वैयक्तिक शतक झळकावलं. मात्र लंचनंतर रोहित आणि शुबमन दोघे झटपट आऊट झाले. रोहितने 103 आणि शुबमन याने 110 धावा केल्या. त्यानंतर सरफराज खान आणि देवदत्त पडीक्कल या दोन्ही युवा शिलेदारांनी टीम इंडियाचा डाव सावरला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 97 धावांची भागीदारी केली.

देवदत्त पडीक्कल याचं पहिलंवहिलं कसोटी अर्धशतक

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, देवदत्त पडीक्कल, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.

इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स, टॉम हार्टली, मार्क वुड, जेम्स अँडरसन आणि शोएब बशीर.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने