Dil Chahata Hai : ‘दिल चाहता है 2’ येणार का ? दिग्दर्शक, फरहान अख्तरणे दिले हटके उत्तर

 

ब्युरो टीम : 2001 साली आलेल्या ‘दिल चाहता है’ चित्रपटाने एक नवा ट्रेंड सेट केला. आमिर खान, सैफ अली खान आणि अक्षय खन्ना यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट प्रचंड गाजला. दोन दशकांहून अधिक काळ उलटून गेल्यानंतरही या चित्रपटाचं चाहत्यांच्या मनावर गारूड कायम आहे. कॉलेजमधल्या तीन मित्रांची कहाणी, त्यांच आयुष्य, प्रेम, त्यांच नातं… असा विविध प्रवास दाखवणारा हा चित्रपट अजूनही लोकांच्या मनात ताजा आहे. या पिक्चरमधील अभिनेत्यांशिवाय चित्रपटाचा दिग्दर्शक, फरहान अख्तरसाठी देखील हा चित्रपट खास आहे, कारण त्याने दिग्दर्शित केलेला हा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटाच्या पार्ट 2 ची अर्थात सिक्वेलची सोशल मीडियावर नेहमी चर्चा होत असते. याबाबत आता फरहान अख्तरनेच भाष्य केलं आहे.

खरंतर इतक्या वर्षांनंतरही ‘दिल चाहता है’ लोकांच्या हृदयात इतका रुजला आहे की, चाहते या चित्रपटाच्या सिक्वेलची मागणी करत असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते फरहानला या चित्रपटाच्या सीक्वेलबद्दल अनेकदा प्रश्नही विचारत असतात. एका मुलाखतीत फरहाननेच याबद्दल सांगितल. लोक जेव्हा दिल चाहता है च्या सिक्वेलबद्दल विचारतात तेव्हा मला त्या प्रश्नांचा कंटाळा येत नाही. एखाद्याने DCH बद्दल विचारलं की मला खूप छान वाटतं, अभिमान वाटतं. माझा पहिलाच चित्रपट लोकांना इतका आवडलाय आणि त्यांना दुसऱ्या पार्टबद्दलही उत्सुकता वाटते, हे पाहून मला खरंच छान वाटतं, असं फरहान म्हणाला.

‘दिल चाहता है 2’ येणार का ?

चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल बोलताना फरहान पुढे म्हणाला की ‘दिल चाहता है 2’ गरज आहे असं मला वाटत नाही. त्या चित्रपटाने जे करणं अपेक्षित होतं ते झालं आहे. मला जे काही सांगायचं होतं ते मी चित्रपटातून सांगितलं आहे. आता पुन्हा त्या चित्रपटाचा सीक्वल आणणं म्हणजे पटकथेत काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करावा लागेल. जे मला आवश्यक वाटत नाही, असं सांगत फरहानने दिल चाहता है च्या सिक्वेलचा विषय संपवला. त्याच्या या स्पष्टीकरणामुळे बरेच चाहते उदास झाले असले तरी अनेक जण त्याच्या ‘डॉन 3’ची आतुरतेने वाट पहात आहेत. चाहत्यांनी डोक्यावर घेतलेल्या डॉन चित्रटाच्या सीरिजमधील नव्या चित्रपटासह फरहान पुन्हा एकदा दिग्दर्शनामध्ये आपले नशीब आजमावणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंग आणि कियारा अडवाणी यांची प्रमुख भूमिका असेल.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने