IPL 2024 : आयपीएल सुरु होण्यागोदारच मुंबई इंडियन्सने केली 'या' घातक गोलंदाजाच्या रिप्लेसमेंटची घोषणा

 

ब्युरो टीम : आयपीएल स्पर्धेचं 17 वं पर्व 22 मार्चपासून सुरु होणार आहे. यासाठी दहा संघांनी कंबर कसली असून आपआपल्या कॅम्पमध्ये सराव सुरु झाला आहे. पण स्पर्धेपूर्वी काही खेळाडूंना दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. मुंबई इंडियन्स संघालाही दुखापतीचा फटका बसला आहे. त्यामुळे स्पर्धेपूर्वी संघात बदल करण्याची वेळ मुंबई इंडियन्स संघावर आली आहे. मुंबई इंडियन्स स्टार खेळाडू या स्पर्धेला मुकणार आहे. मागच्या पर्वात हा खेळाडू मुंबई इंडियन्स संघाचा कणा होता. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून जेसन बेहरेनडॉर्फ आहे. यंदाच्या पर्वात वेगवान गोलंदाजांना चांगला भाव मिळाला असताना त्याच्या जाण्याने मुंबईला फटका बसला आहे. आयपीएलच्या नव्या नियमामुळे वेगवान गोलंदाजांना दोन बाउंसरची परवानगी आहे. त्यामुळे मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांना कोट्यवधी रुपये मिळाले होते. दरम्यान, मुंबई इंडियन्सने जेसन बेहरेनडॉर्फच्या रिप्लेसमेंटची घोषणा केली आहे.

मुंबई इंडियन्सने जेसन बेहरेनडॉर्फच्या बदल्यात इंग्लंडच्या ल्यूक वुडला संघात सहभागी केलं आहे. ल्यूक वेडचा हा पहिला आयपीएल सिझन असणार आहे. त्याच्यासाठी मुंबई इंडियन्सने 50 लाख रुपये मोजले आहेत. ल्यूक वेडने इंग्लंडसाटी 2 वनडे आणि 5 टी20 सामने खेळला आहे. वनडेत त्याच्या नावावर एकही विकेट नाही. दुसरीकडे टी20 मध्ये 9.66 च्या इकोनॉमीने 8 गडी बाद केले आहेते. दुसरीकडे, जेसन बेहरेनडॉर्फने आयपीएलच्या 17 सामन्यात 19 गडी बाद केले होते. आयपीएलच्या मागच्या पर्वात तो 12 सामने खेळला होता. यात त्याने 14 गडी बाद केले होते. मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 24 मार्चला गुजरात टायटन्ससोबत आहेत.

मुंबई इंडियन्सची अपडेटेड टीम : हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, ईशान किशन (विकेटकीपर), डेवाल्ड ब्रेविस, टिम डेविड, तिलक वर्मा, अर्जुन तेंडुलकर, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, नेहल वढेरा, शम्स मुलानी, विष्णु विनोद, पीयूष चावला, रोमारियो शेफर्ड, गेराल्ड कोएत्जी, दिलशान मदुशंका, श्रेयस गोपाल, नुवान तुषारा, अंशुल कंबोज, नमन धीर, मोहम्मद नबी, शिवालिक शर्मा, ल्यूक वुड.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने