IPL 2024 : हार्दिकसाठी हे सर्वात मोठ चॅलेंज; बुमराह बाबतीत घ्यावा लागणार महत्वाचा निर्णय

 

ब्युरो टीम : इंडियन प्रीमियर लीग 2024 मध्ये मुंबई इंडियन्सच्या प्रदर्शनावर सगळ्यांची नजर असेल. कारण या सीजनमध्ये हार्दिक पांड्या कॅप्टन असेल. रोहित शर्माच्या जागी त्याच्याकडे नेतृत्व सोपवण्यात आलय. हार्दिक पांड्याने आपल्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सला डेब्युमध्येच चॅम्पियन बनवलं. आता मुंबई इंडियन्ससोबतही त्याला अशी कामगिरी करण जमेल का?. त्याशिवाय हार्दिक पांड्यासमोर एक चांगली प्लेइंग इलेव्हन बांधण्याच चॅलेंज असेल. आयपीएलनंतर T20 वर्ल्ड कपमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना फिट ठेवण्याची जबाबदारी असेल. जसप्रीत बुमराह सुद्धा त्याच खेळाडूंपैकी एक आहे. त्याच्या फिटनेसची विशेष काळजी घ्यावी लागेल. ग्लेन मॅक्ग्राने सुद्धा हेच म्हटलय.

ऑस्ट्रेलियाचा महान वेगवान गोलंदाज ग्लेन मॅक्ग्रा म्हणाला की, जसप्रीत बुमराहला सीजनमध्ये ब्रेकची आवश्यकता आहे. बुमराहची गोलंदाजीची Action अशी आहे की, त्याला आरामाची गरज पडणार. त्याला दुखापत होऊ शकते. बुमराहच्या पाठिच्या दुखण्यावर मार्च 2023 मध्ये स्ट्रेस फ्रॅक्चरची सर्जरी झाली. तो बराच काळ मैदानापासून लांब होता. सप्टेंबर 2022 पासूनच तो मैदानापासून दूर गेला. या दरम्यान ऑस्ट्रेलियात 2022 वर्ल्ड कप आणि आयपीएल 2023 मध्ये बुमराह खेळू शकला नाही. मॅक्ग्राच्या मते, बुमराहची गोलंदाजीची जी एक्शन आहे, ते पाहता, आयपीएल दरम्यान त्याला आराम मिळण्याची गरज आहे. असं झालं नाही, तर त्याला दुखापत होऊ शकते. आता प्रश्न हा आहे की, पांड्या बुमराहचा वापर कसा करणार?

हार्दिकसाठी हे सर्वात मोठ चॅलेंज

जसप्रीत बुमराह सध्या कमालीचा फॉर्ममध्ये आहे. त्याने वर्ल्ड कपमध्ये 20 विकेट घेतले होते. इंग्लंड विरुद्ध टेस्ट सीरीजमध्ये सुद्धा त्याने लाजवाब गोलंदाजी केली. आता टी20 वर्ल्ड कप सुद्धा गाजवण्याचा त्याचा प्रयत्न असेल. पण त्याचा आयपीएलमध्ये कसा वापर होतो, यावर बरच काही अवलंबून असेल. आयपीएलमध्ये प्रत्येक सामना जिंकण महत्त्वाच असतं. हार्दिकसाठी हे सर्वात मोठ चॅलेंज असेल. बुमराहला कुठल्या मॅचमध्ये आरामा द्यायचा आणि कुठल्या मॅचमध्ये खेळवायच.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने