ब्युरो टीम : आयपीएल 2024 मधील सातव्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने गुजरात टायटन्स संघावर 63 धावांनी विजय मिळवला आहे. गुजरात संघाला सीएसकेने दिलेल्या 207 धावांचा पाठलाग करण्यात यश आलं नाही. गुजरात संघाला 20 ओव्हरमध्ये 143-8 धावा करता आल्या. या विजयासह सीएसकेने आता पॉईंट टेबलमध्ये मोठी झेप घेतली आहे. पहिल्या स्थानावर उडी घेतली असून 63 धावांनी विजय मिळवल्यामुळे नेट रन रेटमध्ये भरघोस फायदा झाला आहे.
संघ सामने विजय पराजय नेट रनरेट गुण
चेन्नई सुपर किंग्स 2 2 0 +1.979 4
राजस्थान रॉयल्स 1 1 0 +1.000 2
कोलकाता नाईट रायडर्स 1 1 0 +0.200 2
पंजाब किंग्स 2 1 1 0.025 2
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु 2 1 1 -0.180 2
गुजरात जायंट्स 2 1 1 -1.425 2
सनरायझर्स हैदराबाद 1 0 1 -0.200 0
मुंबई इंडियन्स 1 0 1 -0.300 0
दिल्ली कॅपिटल्स 1 0 1 -0.495 0
लखनऊ सुपर जायंट्स 1 0 1 -1.000 0
पॉईंट टेबलमध्ये चार गुणांसह सीएसकेने पहिलं स्थान मिळवलं आहे. सीएसकेने मिळवलेल्या मोठ्या विजयामुळे नेट रनरेट +1.979 झाला आहे. तर गुजरात टायटन्स संघाचा नेट रनरेट -1.425 झाला असून सहाव्या क्रमांकावर संघाची घसरण झाली आहे. राजस्थान संघ आता दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. कोलकाता संघ तिसऱ्या, पंजाब किंग्स चौथ्या, आरसीबी पाचव्या आणि गुजरात आता सहाव्या स्थानावर आली आहे.
सामन्याचा धावता आढावा
गुजरात संघाने टॉस जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. चेन्नई सुपर किंग्ज संघाने प्रथम फलंदाजी करताना 206-6 धावांचा डोंगर उभा केला होता. यामध्ये शिवम दुबे याने 23 चेंडूत 51 धावांची आक्रमक खेळी केली. तर ऋतुराज गायकवाड आणि रचिन रवींद्र या दोघांनी 46 धावा करत पाया रचला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातकडून साई सुदर्शन याने सर्वाधिक 31 धावा केल्या.
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): ऋतुराज गायकवाड (C), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी (WK), दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): रिद्धिमान साहा (WK), शुबमन गिल (C), अजमतुल्ला ओमरझाई, डेव्हिड मिलर, विजय शंकर, राहुल तेवतिया, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, उमेश यादव, मोहित शर्मा, स्पेन्सर जॉन्सन
टिप्पणी पोस्ट करा