ब्युरो टीम : जया बच्चन यांनी एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. जया बच्चन या फक्त अभिनयासाठीच नाही तर राजकारणातही चांगल्याच सक्रिय दिसतात. जया बच्चन या बऱ्याच वेळा पापाराझी यांच्यावर चिडताना दिसतात. मात्र, काही दिवसांपूर्वीच अनंत अंबानीच्या प्री वेडिंग फंक्शनमध्ये चक्क पापाराझी यांच्याकडे पाहून स्माईल देताना जया बच्चन या दिसल्या. जया बच्चन यांचे हे बदलले सूर पाहून चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. जया बच्चन यांनी नुकताच मोठे विधान केलंय. आता जया बच्चन यांच्या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे.
जया बच्चन या नुकताच नात नव्या नवेली नंदा हिच्या शोमध्ये पोहचल्या. यावेळी जया बच्चन यांच्यासोबत श्वेता बच्चन देखील होती. बऱ्याच विषयांवर यांच्यामध्ये चर्चा झाली. सध्या जया बच्चन यांनी केलेल्या एका विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. यावेळी काही मोठे खुलासे देखील जया बच्चन यांनी केले आहेत.
‘वॉट द हेल नव्या’ शोमध्ये नुकताच जया बच्चन या इंटरनेटचे फायदे आणि तोट्यांविषयी बोलताना दिसल्या. जया बच्चन या थेट म्हणाल्या की, तरुणांमधील चिंतेचे मूळ कारण हे ऑनलाइन मिळणारी जास्त माहिती हेच आहे. फक्त हेच नाही तर फोन काॅलला उत्तर देणे आणि मोबाईल मेसेजला उत्तर देणे याचा एकप्रकारे दबाव तरुणांमध्ये बघायला मिळतो.
अलीकडेच, ‘नव्या’च्या पॉडकास्टमध्ये जया बच्चन यांनी इंटरनेटचे फायदे आणि तोटे याविषयी चर्चा केली आणि सांगितले की तरुणांमध्ये चिंतेचे मूळ कारण त्यांना ऑनलाइन मिळणारी जास्त माहिती आहे. जया म्हणाल्या की, तरुणांवर नेहमी कॉल्सचे उत्तर देणे, त्यांच्या मोबाइलवरील मेसेजला प्रतिसाद देणे यासाठी खूप दबाव असतो
पुढे नव्याने विचारले की, जुनी पिढी कमी तणावग्रस्त असायची का? यावर थेट जया बच्चन म्हणाल्या की, होय त्यावेळी तणाव इतका जास्त नक्कीच नसायचा. पुढे जया बच्चन म्हणाल्या, तुम्हाला वाटते की, तुम्ही तणावग्रस्त नाहीत पण तुम्ही तणावग्रस्त आहात. यासर्व गोष्टींना जया बच्चन यांनी इंटरनेटला जबाबदार धरले आहे.
टिप्पणी पोस्ट करा