Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी साजरी केली मराठा बांधवांसोबत रंगपंचमी

 


ब्युरो टीम : मागील काही दिवसापासून मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे  पाटील चांगलेच चर्चेत आहेत. होळीचा सण सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही होळी साजरी केली आहे. त्यांनी अंतरवाली गावात त्यांच्या सहकाऱ्यांसोबत रंगपंचमीचा आनंद लुटला आहे.  

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहेत. त्यांनी अंतरवाली सराटी गावात त्यांच्या सहकाऱ्यांसोबत रंगपंचमी उत्साहात साजरी  केली आहे. यावेळी उत्साहात कार्यकर्ते त्यांना रंग लावताना दिसून आले आहेत. अंतरवाली सराटीमध्ये अतिशय उल्हासमय वातावरणात रंगपंचमी पार पडत आहे. जरांगेंना कार्यकर्त्यांनी रंग लावत होळी साजरी केली आहे.



मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृतवाखाली २४ मार्च रोजी अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाची महाबैठक पार पडली. राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेले 10 टक्के आरक्षण 50 टक्क्यांच्या आत द्यावं, असा मुद्दा त्यांनी या बैठकीत उपस्थित केला होता.

लोकसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक गावातून उमेदवार उभा करण्यापेक्षा जिल्ह्यातून एकच उमेदवार उभा करा. जोपर्यंत राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नाही. त्यामुळे तुम्हीच आरक्षण देणारे व्हा, असं आवाहन जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलंय.

 लोकसभा निवडणुकीसाठी जरांगे पाटलांच्या मराठा समाजाला सूचना; म्हणाले, या उमेदवारांना द्या पाठींबा

आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा समाजाने प्रत्येक गावातून उमेदवार दिल्यास मराठा समाजच अडचणीत येईल. त्यामुळं आपापल्या गावात मराठा समाजाची बैठक घ्या. सर्व जाती धर्माचा मिळून जिल्ह्यातून एकच उमेदवार निश्चित करा. त्यालाच अपक्ष निवडणूक लढवायला लावा. किंवा मग सगेसोयरे कायद्याला पाठिंबा देणाऱ्या उमेदवारालाच पाठिंबा द्या, असे दोन पर्याय जरांगे यांनी मराठा समाजासमोर ठेवले आहेत.

राज्य सरकार जर मराठा समाजाला आरक्षण देत नसेल, तर आता आरक्षण देणारे बना असं आवाहन देखील मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलं आहे. तीस तारखेपर्यंत कोण उमेदवार असणार, हे निश्चित करा असंही जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने