Maratha Arkshan : राज्य सरकारकडून मराठा समाजाची फसवणूक; लोकसभेसाठी उमेदवार देणार

 

ब्युरो टीम : मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलन सुरु करण्यात आहे. राज्य सरकारने मराठा समाजास दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. परंतु हा निर्णय मराठा समाजास मान्य नाही. यामुळे मराठा समाजाने गावागावत बैठका घेणे सुरु केले आहे. या बैठकांच्या माध्यमातून लोकसभेसाठी उमेदवार देण्याचा निर्णय घेतला जात आहे. अनेक ठिकाणी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. यामुळे लोकसभा निवडणुका ईव्हीएमवर घेता येणार नाही.

मावळ लोकसभेसाठी उमेदवार देणार

मावळ लोकसभा मतदारसंघात मराठा समाज उमेदवार देणार आहे. राठा समाजाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मावळ लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवार देण्यात येणार आहे. आता दुसरीकडे मावळ लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाकडून देखील उमेदवार देण्यात येणार आहे. त्यासाठी मावळ तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने गावोगावी बैठका घेण्यास सुरुवात केलेली आहे.

राज्य सरकारकडून फसवणूक

राज्य सरकारने गाजर दाखऊन मराठा समाजाची फसवणूक केली आहे. त्यासाठी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आपला सरकारला हिसका दाखवायचा आहे. दरम्यान प्रत्येक गावातून दोन उमेदवार देण्याची चर्चा या बैठकीत करण्यात आली. मावळ लोकसभा मतदारसंघात चिंचवड, मावळ, कर्जत मोठ्या प्रमाणात मराठा समाज आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाच्या मतदानाचा प्रभाव हा उमेदवारांना दिसून येणार आहे.

दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी 24 मार्चला बैठक बोलवली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांना कायद्याने खेटायचे ठरवले आता मराठेही कायद्यानेच खेटणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

चौघांनी जीवन संपवले

आधी आरक्षण नंतर इलेक्शन म्हणत आरक्षणासाठी मराठवाड्यात चार जणांनी जीवन संपवले. आष्टी, बीड, बदनापूर, रेनापूर येथे आत्महत्याच्या घटना घडल्या. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी स्टेटस ठेवून तसेच पत्र लिहून यांनी जीवन संपवले. उद्धव कोल्हे, नंदकुमार जाधव,चंद्रकांत पतंगे, दिलीप सोनवणे असे चार जणांची नावे आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने