Maval : मावळ मध्ये शिवसेनेचा विद्यमान खासदार पण अजून महायुतीला उमेदवार मिळेना; निर्णय प्रलंबित

 

ब्युरो टीम : पुणे जिल्ह्यातील मावळ, पुणे, शिरूर आणि बारामती चार मतदार संघ आहे. यामध्ये पुणे, शिरुर, बारामतीमध्ये उमेदवार जवळपास निश्चित झाले आहेत. परंतु मावळ लोकसभा मतदार संघात महायुती अन् महाविकास आघाडीला अजूनही उमेदवार मिळत नाही. लोकसभेचा मावळ मतदारसंघ महायुतीतील शिवसेना भाजपला की राष्ट्रवादीला जाणार याबाबत अद्यापही अंतिम निर्णय झालेला नाही. यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघात उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे.

बैठकांचे सत्र, निर्णय प्रलंबित

मावळ शिवसेनेच्या जागेवर भाजप आणि राष्ट्रवादीचा दावा कायम आहे. यावर विषयावर बैठका सुरू आहेत. परंतु इच्छुकांचा जीव टांगणीला लागलेला आहे. घाटाखाली भाजप राष्ट्रवादीची संदिग्ध भूमिका आहे. मावळ पिंपरी चिंचवड या तीन विधानसभा मतदारसंघातील भाजप आणि राष्ट्रवादीच्या गटाने मागणी केली असती तरी घाटाखाली भाजप आणि राष्ट्रवादीच्या गटाची भूमिका अद्यापही स्पष्ट नाही. घाटाखालील नेते याबाबत बोलत नसल्याचे दिसून येत आहे.

मावळ शिवसेनेची जागा

मावळमध्ये शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे आहेत. महायुतीच्या जागा वाटपात ही जागा शिवसेनेला जाणार असल्याचा दावा केला जात आहे. मात्र गेल्या महिन्यापासून या मतदारसंघावर भाजप आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटांनी दावा केला आहे. यासंदर्भात भाजप आणि राष्ट्रवादीतील स्थानिक नेत्यांच्या अनेक बैठका सुरू आहेत. त्यामुळे अद्याप मावळ लोकसभेची उमेदवारी कुणाला यांचा तिढा कायम आहे.

मावळमध्ये अजून रंगत नाही

बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांनी प्रचार सुरु केला आहे. पुणे मतदार संघात मुरलीधर मोहोळ यांचा प्रचार सुरु झाला आहे. काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांचे नाव पुढे आले आहे. शिरुरमध्ये विद्यामान खासदार अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजी आढळराव पाटील यांची उमेदवारी नक्की झाली आहे. यामुळे या तीन लोकसभा संघात उमेदवारांचा प्रचार सुरु झाला आहे. परंतु मावळमध्ये अजून रंगत नाही.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने