ब्युरो टीम : आयपीएल 2024 स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा पहिला सामना गुजरात टायटन्ससोबत आहे. 24 मार्चला हा सामना रंगणार आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वात गुजरात टायटन्स आणि हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स आमनेसामने असणार आहे. आयपीएलच्या मागच्या पर्वात मुंबई इंडियन्सचा संघ चौथ्या स्थानावर राहील. पण मागच्या पर्वात काही फलंदाजांनी आपली छाप सोडली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही या खेळाडूंनी आपली चमक दाखवली आहे. त्यामुळे पाच फलंदाज मुंबई इंडियन्सला मोठी धावसंख्या आणि दिलेल्या धावांचा पाठलाग करण्यासाठी मदत करू शकतात. या पाच फलंदाजांवर खऱ्या अर्थाने मुंबई इंडियन्सची धुरा असणार आहे. सूर्यकुमार यादव, इशान किशन, तिलक वर्मा, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आणि टिम डेविड हे फलंदाज जमेची बाजू असमार आहेत.
सूर्यकुमार यादव SKY या नावाने प्रसिद्ध आहे. सूर्यकुमार यादवने 2023 मध्ये 43.21 च्या सरासरीने आणि 181.13 च्या स्ट्राइक रेटने 605 धावा केल्या होत्या.या खेळीत 28 षटकार मारले आणि गेल्या मोसमात नाबाद 103 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती.
इशान किशन हा यष्टिरक्षक फलंदाज आहे. डावखुरा इशान किशन आक्रमक फटकेबाजीसाठी प्रसिद्ध आहे. मागच्या पर्वात इशानने 30.27 च्या सरासरीने आणि 142.76 च्या स्ट्राइक रेटने 454 धावा केल्या होत्या.
डावखुरा फलंदाज आणि फिरकीपटू तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी महत्त्वाच्या फलंदाजांपैकी एक आहे. तिलक वर्माने आयपीएल 2023 मध्ये 42.88 च्या सरासरीने 343 धावा केल्या होते. तिलक वर्माची या स्पर्धेत नाबाद 84 धावा ही सर्वोच्च धावसंख्या होती.
मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माने सलामीला येत विरोधी संघाची दाणादाण उडवून देतो. मागच्या पर्वात त्याने 20.75 च्या सरासरीने 332 धावा केल्या होत्या. आता त्याच्याकडे कर्णधारपदाची धुरा नाही. त्यामुळे तो अजून आक्रमकपणे फलंदाजी करू शकतो.
हार्दिक पांड्याकडे मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद आहे. हार्दिक कोणत्याही स्थानावर उतरून सामन्याचं चित्र पालटण्याची ताकद ठेवतो. आतापर्यंत 123 सामने खेळला असून 2309 धावा केल्या आहेत. यात 91 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. मागच्या पर्वात हार्दिक पांड्या 16 सामने खेळला आमि 346 धावा केल्या.
मिनी ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्सने टिम डेविडला संघात सहभागी करून घेतलं आहे. 8.25 कोटी रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतलं आहे. टिम डेविड आतापर्यंत 25 सामने खेळला असून 418 धावा केल्या आहेत. मागच्या पर्वात 16 सामने खेळणाऱ्या टिम डेविडने 231 धावा केल्या होत्या. यात 15 षटकार मारले होते
टिप्पणी पोस्ट करा