NDA : यंदा NDA 400 पार जागा मिळवणार ; शिर्डीत साईबाबा दर्शनानंतर 'या' नेत्याचे वक्तव्य

 

ब्युरो टीम : लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं गेलं आहे. अशात सर्वच राजकीय पक्षांकडून विजयाचा दावा केला जात आहे. महायुतीला घवघवीत यश मिळेल, असा दावा बिहारमधील लोक जनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान यांनी व्यक्त केला आहे. लोकजनशक्ती पार्टीचे चिराग पासवान सहपरिवार साई दरबारी हजेरी लावली. लोकसभा निवडणुकी अगोदर चिराग पासवान यांनी साईबाबांचं दर्शन घेतलं. दुपारच्या मध्यान्ह आरतीला ते सहकुटुंब उपस्थित होते. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

महायुती यश मिळणारच- पासवान

आताच्या लोकसभेच्या निवडणुकीत बिहारमध्ये महायुतीला किती जागा मिळतील, असं वितारण्यात आलं. तेव्हा बिहारच्या गावागावात मी अडीच तीन वर्ष फिरलो आहे. बिहारमधील 40 पैकी 40 जागा एनडीएला मिळतील. लोक जनशक्ती पार्टीच्याही सर्वच्या सर्व पाच जागा जिंकू. 400 पार जागा जिंकण्याचं आमचं स्वप्न आहे. त लक्ष आहे ते पूर्ण करू, असं चिराग पासवान म्हणाले.

विरोधकांवर निशाणा

नितीश कुमार तेजस्वी सोबत होते तेव्हा सर्वात चांगले होते, असं विरोधकांना वाटतं. सत्तेत राहण्याचा मोह विरोधकांना आहे. खास करून आरजेडी सत्तेत कसं यावं यासाठी नेहमी ते प्रयत्नात असतात. विविध आघाडी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला मात्र शेवटी जनता सर्व निर्धारित करते. जनतेने ठरवलय 40 जागा एनडीए जिंकेल. आमची ताकद वाढलीय, असंही चिराग पासवान म्हणालेत.

“…म्हणून साईंच्या चरणी लीन”

लोकसभा निवडणुका समोर आहेत. त्यामुळे मनात इच्छा होती की, निवडणुकीच्या रिंगणात उतरण्या अगोदर एकदा साईबाबांचे दर्शन घ्यावे. त्यामुळे सह परिवार आज दर्शनासाठी आलोय. देशवासीयांसाठी येणारा काळ उत्तम काळ असणार आहे. भारताला पुन्हा एकदा मजबूत सरकार मिळो…अशी अपेक्षा घेऊन आज दर्शनासाठी हजेरी लावलीय, असं चिराग पासवान म्हणाले.

माझे वडील रामविलास पासवान यांच्या आठवणी येथे आल्यानंतर ताज्या झाल्या. मी शिर्डीला अगोदर वडीलांसोबत आलो होतो. त्यांचे आशिर्वाद आमच्या सोबत आहेत. कठीण काळात त्यांचे आशिर्वाद सोबत होते. त्यांचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करायचं आहे, असं चिराग पासवान यांनी म्हटलं.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने