Prakash Ambedkar ; भाजपा २०० आत जागा जिंकणार; नितीन गडकरी पंतप्रधान होणार - प्रकाश आंबेडकर

 

ब्युरो टीम : भाजपकडून देशांमध्ये 400 च्या गप्पा सुरू असल्या, तरी त्यांना काँग्रेसकडून गडचिरोलीमध्ये जाहीर केलेला उमेदवार पळून न्याव्या लागत असल्याची घणाघाती टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी माझा कट्ट्यावर बोलताना केली. यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी देशभरामध्ये भाजपकडून 400 चा दावा करण्यात येत असला तरी यामध्ये तथ्य नसल्याचे म्हणाले. 

देशामध्ये भाजप 170 ते 175 जागा जिंकेल 

प्रकाश आंबेडकर यांना भाजप राज्यासह देशभरामध्ये किती जागा जिंकेल? असं विचारलं असता प्रकाश आंबेडकर यांनी मोठा दावा केला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी देशामध्ये भाजप 170 ते 175 जागा जिंकेल, दावा केला आहे. इतकेच नव्हे तर त्यांना राज्यांमध्ये भाजप किती जागा जिंकेल? याबद्दल विचारलं असता त्यांनी ही भूमिका थोडी गुलदस्तात राहू द्या असं स्मितहास्य करत उत्तर दिले. 

देशाचे पुढील पंतप्रधान कोण असतील? प्रकाश आंबेडकर म्हणाले.. 

भाजपच्या दोनशेच्या खाली राहिल्यास देशाचे पुढील पंतप्रधान कोण असतील? असे त्यांना विचारण्यात आलं असता प्रकाश आंबेडकर यांनी भाजप 200 च्या खाली राहिल्यास सर्वपक्षीय संबंध असल्याने नितीन गडकरी हेच भाजपकडून पंतप्रधान होतील, असं वक्तव्य माझा कट्ट्यावर बोलताना केलं. तसेच त्यांनी भूपेंद्र यादव यांचंही नाव प्रकाश आंबेडकर यांनी घेतले. त्यांचेही सर्वपक्षीय संबंध असल्याचे आंबेडकर म्हणाले. दरम्यान, ही स्थिती इंडिया आघाडीच्या बाजूने राहिल्यास कोण चेहरा असेल? यावेळी विविध प्रादेशिक नेत्यांची नावे घेतली. तसेच काँग्रेस जो चेहरा समोर आणेल, त्यावर परिस्थिती अवलंबून असल्याचे ते म्हणाले. यामध्ये ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, स्टॅलिन यांचा पर्याय असल्याचे सांगितले. 

प्रकाश आंबेडकर अजूनही सावध भूमिकेत 

दरम्यान, प्रकाश आंबेडकर माझा कट्ट्यावर बोलताना अनेक प्रश्नांवर सावधपणे बोलताना दिसून आले. त्यांनी अजूनही महाविकास आघाडीची बोलण्याची तयारी असल्याचे आपल्या भूमिकेतून दाखवून देण्याचा प्रयत्न केला. महाविकास आघाडीमधील जागावाटपांवर भाष्य करताना वाद असल्याचे  त्यांनी सांगितले, पण कोणत्या जागांवर वाद आहे या प्रश्नाचे उत्तर दिले नाही. दरम्यान, 26 मार्चपर्यंत आम्ही वाट पाहणार असून त्यानंतर राज्यात किती आणि कोणत्या जागा लढणार आहोत, याबाबत भूमिका जाहीर करू असेही ते म्हणाले. जालन्यातून मनोज जरांगे पाटील लोकसभेच्या रिंगणात असल्यास 70 टक्के मते देऊ, असाही दावा आंबेडकर यांनी केला


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने