ब्युरो टीम : पुणे शहरात शुक्रवारी मध्यरात्रीपासून तणाव निर्माण झाला होता. कसबा पेठेत दर्ग्याचे अतिक्रमण काढण्याच्या अफवेमुळे तणाव निर्माण झाला होता. या प्रकरण पुणे पोलिसांनी संयमाने हाताळत शहरात शांतता निर्माण केली. त्यानंतर पोलिसांनी शेख सल्लाउद्दीन दर्ग्याच्या ट्रस्टची बैठक घेतली. या बैठकीत दर्ग्याचे अनधिकृत बांधकाम काढण्याची तयारी ट्रस्टकडून देण्यात आली. पुणे पोलिसांच्या या पुढाकारामुळे शहरातील तणाव निवळला आहे. दर्ग्याचे अतिक्रमण काढण्याबाबतचे निवेदन ट्रस्टीकडून देण्यात आले आहे.
बैठकीत महत्वाचा निर्णय
पुण्यातील शेख सल्लाउद्दीन दर्ग्याच्या अनधिकृत बांधकामाबाबत ट्रस्टचा महत्वपूर्ण निर्णय झाला आहे. दर्ग्याचे बांधकांम हे अनधिकृत असल्याची ट्रस्टकडून कबुली देण्यात आली. छोटा शेख सल्लाहुद्दीन दर्गा ट्रस्टी, पुणे मनपा आणि पुणे पोलिसांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. त्यानंतर ट्रस्टींकडून अतिक्रमण झालेले बांधकाम स्वता:हून काढून घेण्याची तयारी दर्शवली. दर्ग्याच्या ट्रस्ट कडून स्वतः दर्ग्याच्या बाजूचा अतिक्रमण हटवण्यात येणार आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घेतलेल्या बैठकीत ट्रस्टने हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला. ट्रस्टीने विनंती केल्यास कायदेशीर असलेल्या कामांच्या नूतनीकरणासाठी पुणे मनपाकडून मदत करण्यात येणार आहे.
अधिकाऱ्यांच्या सुट्या रद्द
पुणे शहरात शुक्रवारी अफवेमुळे तणाव निर्माण झाला होता. यामुळे पुणे पोलीस दलातील सर्व पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या आज आणि उद्या करण्याचे रद्द आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काढले आहेत. शहरातील तणावाच्या पार्श्वभूमीवर हा महत्वाचा निर्णय आयुक्तांनी घेतला. त्याचवेळी संवेदनशील परिस्थिती उत्तमपणे हाताळली. याबद्दल नागरिकांकडून कौतूक केले जात आहे.
पुणे पोलीसांनी शुक्रवारी मध्यरात्री घडलेल्या घटनेबाबत अफवा पसरवणाऱ्या शोध सुरु केला आहे. पुणे आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबत आदेश अधिकाऱ्यांना दिले आहे. यामुळे अफवा पसरवणाऱ्याचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई होणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा