ब्युरो टीम : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठत दिनांक 8 मार्च रोजी सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रित मिळून आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. स्त्री मुक्तीची गीते, कविता,मनोगते,भाषणे अश्या विविध प्रकारातून सर्व विद्यार्थी - विद्यार्थिनी ह्या कार्यक्रमात व्यक्त झाले. त्याच बरोबर सावित्रीबाई फुले ह्यांच्या पुतळ्याला मानवंदना देण्यात आली, तसेच पुतळ्यासमोर दीपोत्सव करण्यात आला.राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेस व विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती ह्यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यान मधून सिद्धांत जांभुळकर ह्यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले तसेच अर्पिता देशभरतर, ऋतुजा कापसे शकील शेख, स्वप्नील तांबे ह्यांनी मनोगत व्यक्त केले. स्वप्नील तांबे यांनी ताराबाई शिंदे यांच्या स्त्री पुरुष तुलना या ग्रंथाचे विवेचन केले. तसेच ह्या कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शनात अक्षय कांबळे ह्यांनी स्त्री समानतेबद्दल समाजाची मानसिकता कशी बदलली पाहिजे आणि या बदलाची सुरवात स्वतः पासून झाली पाहिजे हा संदेश दिला.
टिप्पणी पोस्ट करा