ब्युरो टीम : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये NSUI च्या वतीने विद्यापीठ व विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर लाक्षणिक धरणे आंदोलन होणार होते. 1. सिनेट सदस्यांना भेटल्यामुळे विद्यार्थ्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत. 2. प्राध्यापक भरतीत 10 टक्के मराठा आरक्षण लागू करावे.3. विद्यापीठातील विद्यार्थीनींवरची मॉरल पोलिसींग थांबवावी. 4. विद्यापीठातील शिष्यवृत्तीतल्या जाचक अटी काढून टाकाव्यात. 5. विद्यापीठाने नवीन शैक्षणिक वर्षातली भरमसाठ शुल्कवाढ रद्द करावी. या व इतर प्रमुख मागण्या घेऊन NSUI आणि इतर समविचारी संघटना आंदोलन करणार होती. परंतु रात्री उशिरा चतुर्शिंगी पोलीस स्टेशने आंदोलनाची परवानगी नाकारली. त्यानंतर आंदोलन विद्यार्थी व प्रतिनिधींनी दिवसभर मा. कुलगुरू महोदय यांची भेट घेऊन केवळ निवेदन देण्याचा प्रयत्न केला. तिथे देखील विद्यापीठ सुरक्षारक्षकांनी दमदाटी करत. निवेदन देण्यासाठी गेटच्या आतमध्ये देखील येऊ दिले नाही . विद्यापीठपात पुर्णपणे दडपशाही चालू आहे. विद्यार्थी प्रश्नांवर बोलणे देखील गुन्हा झाले आहे.
विद्यार्थीच्या विविध मागण्या घेऊन आम्ही आंदोलन करणार होतो. आम्हाला आंदोलनास परवानगी नाकारलीच सोबतच निवेदन देण्यासाठी देखील येऊ दिलं नाही. ही कुठली दडपशाही आहे. हुकुमशाही पद्धतीने विद्यापीठाचा कारभार चालू आहे. काहीही झाले तरी आम्ही विद्यार्थीच्या मागण्या घेऊन लढत राहू संघर्ष करत राहु. असे NSUI सचिव अक्षय कांबळे यांनी म्हटले आहे.
टिप्पणी पोस्ट करा