Pune Vande Bharat train : पुण्यासाठी दोन नव्या वंदे भारत ट्रेन सुरु होणार

 

ब्युरो टीम : पुण्याहून दोन नव्या वंदे भारत गाड्या सुरू होणार आहे. या नव्या गाड्या पुण्याला वडोदरा आणि सिकंदराबादशी जोडणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विविध शहरांमधून धावणाऱ्या 10 वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत. पहिली वंदे भारत एक्सप्रेस मुंबई ते गांधीनगर दरम्यान सुरू करण्यात आली. त्यानंतर मुंबई-पुणे-सोलापूर, मुंबई ते शिर्डी, मुंबईगोवा, मुंबई-जालना, नागपूर ते बिलासपूर मार्गावर वंदे भारत गाड्या सुरू करण्यात आल्या. आता देशात आणखी 10वंदे भारत गाड्या सुरू होणार असून त्यापैकी दोन गाड्या महाराष्ट्रातून असणार आहेत.

देशभरातील विविध तीर्थक्षेत्रांना जोडण्यासाठी वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात येत आहे. वंदे भारत ट्रेन देशातील विविध ठिकाणांहून अयोध्येला जातात. राज्यात शिर्डीसाठी वंदे भारत ट्रेन चालवली जात आहे. पुणे ते शेगाव आणि मुंबई ते शेगाव अशी वंदे भारत ट्रेन सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे मुंबई, पुण्यातील भाविकांना संत गजानन महाराजांचे दर्शन घेणे सोपे होणार आहे

स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन

अमृत भारत आणि वंदे भारत ट्रेनच्या यशानंतर वंदे भारत ट्रेनचे स्लीपर व्हर्जनही लाँच करण्यात येणार आहे. बेंगळुरूमध्ये ऑक्टोबर 2023 पासून वंदे भारत एक्सप्रेसस्लीपर प्रोटोटाइपचे काम सुरू आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये राजधानी एक्सप्रेस गाड्यांपेक्षा अधिक चांगल्या सुविधा असतील. वंदे भारत स्लीपर ट्रेनचे एकूण 10 सेट तयार केले जात आहेत.

पुणेकरांना तीन वंदे भारत गाड्यांमधून प्रवास करता येणार

सध्या बिलासपूर-नागपूर, मुंबई-शिर्डी, मुंबई-सोलापूर आणि मुंबई-गोवा मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत गाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोल्हापूर-मुंबई वंदे भारत सुरू करण्यात यावा, अशी मागणी रेल्वे समितीच्या बैठकीत केली होती. तसेच सध्या मुंबई-सोलापूर मार्गावर पुण्यामार्गे वंदे भारत गाडी धावते, तर नवी पुणे-बडोदा गाडी सुरू करण्यात येणार आहे. प्रस्तावित मुंबई-कोल्हापूर वंदे भारत हा मार्गही पुण्यामार्गे चालविण्यात येणार आहे. त्यामुळे पुण्यातील प्रवाशांना आता तीन वंदे भारत गाड्यांमधून प्रवास करता येणार आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने