ब्युरो टीम : टी20 वर्ल्डकप स्पर्धेत रोहित शर्माच्या खांद्यावर नेतृत्वाची धुरा असणार आहे. जवळपास दीड वर्षानंतर रोहित शर्मा अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत टी20 खेळला. इतकंच काय तर या मालिकेत कर्णधारपदही भूषवलं होतं. टी20 वर्ल्डकप 2022 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत इंग्लंडने पराभूत केल्यानंतर रोहित शर्मा या फॉरमॅटपासून दूर होता. अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यात रोहित शर्माला आपलं खातंही खोलता आलं नव्हतं. त्यामुळे रोहित शर्मावर दडपण स्पष्ट दिसत होतं. कारण कर्णधारपदाची जबाबदारी असताना शून्यावर बाद होणं क्रीडाप्रेमींना रुचणारं नव्हतं. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात काहीही करून धावा करायच्या होत्या. रोहित शर्माने या सामन्यात 69 चेंडूत 121 धावंची खेळी केली होती. पण सुरुवातीला रोहित शर्मा धावांसाठी धडपड करताना दिसला होता. इतकंच काय तर पहिल्यांदा चौकार आल्यानंतर खूश झाला होता. पण पंचांना लेग बाय देत चौकार दिला. त्यामुळे रोहित शर्मा नाराज दिसला आणि थेट पंचांशी संवाद साधला होता. त्यांचं बोलणं स्टम्प माईकमध्ये रेकॉर्ड झालं होतं
विरेंदर शर्मा हे या सामन्यात पंच होते. तेव्हा रोहित शर्माने पंचांना विचारलं की, ‘अरे विरू, थाय-पॅड दिला का पहिला चौकार? बॅट लागली होती.’, असं रोहित शर्माने पंचांना विचारलं होतं. आता कुठे त्या संभाषणावर कर्णधार रोहित शर्मा याने मौन सोडलं आहे. पाचव्या कसोटी सामन्यासाठी धर्मशाळेत पोहोचलेल्या रोहित शर्माने याबाबत आता खुलासा केला आहे.
🔊Agree to disagree! 😉
Skipper Rohit Sharma pleads his case to the umpire for a turned-down boundary! 🤯#GiantsMeetGameChangers #JioCinemaSports #INDvAFG #IDFCFirstBankT20ITrophy pic.twitter.com/vGmrtQgtjh
— JioCinema (@JioCinema) January 17, 2024
“जेव्हा तुम्ही सलग दोनदा शून्यावर बाद होता. तेव्हा एका धावेचं महत्त्व असतं. मी बॅटने चौकार मारला होता पण पंचांनी ते नीट पाहिलं नाही लेग बाय दिला. खरं तर मी फलंदाजी करताना स्कोअरबोर्डकडे पाहात नाही. माझं सगळं लक्ष फलंदाजीकडे असतं. पण जे व्हा ओव्हर संपली. तेव्हा माझं लक्ष वर गेलं तेव्हा स्कोअरबोर्डवर रोहित शर्मा 0 असं होतं. मला वाटलं की माझ्या खात्यात चौकार असेल. पण तिथे शून्य होतं. तेव्हा मी विचारलं की विरू आधी थायपॅड दिलं का?”, असा खुलासा रोहित शर्मा याने केला.
मैदानावरील इतर संभाषणाबाबतही रोहित शर्माला विचारलं असता म्हणाला की, ‘मी असं काही ठरवून बोलत नाही. तसेच मुद्दामही करत नाही. कर्णधार असल्याने मी स्लिपमध्ये उभा राहतो. कारण तेथून मला क्षेत्ररक्षण व्यवस्थितरित्या पाहता येते. तसेच डीआरएसचा आढावा घेता येतो. तेव्हा मी क्षेत्ररक्षकांशी बोलतो आणि ते सर्व रेकॉर्ड होतं.
टिप्पणी पोस्ट करा