ब्युरो टीम : आयपीएल 2024 स्पर्धेत मुंबई इंडियन्सचं नेतृत्व हार्दिक पांड्याच्या हाती सोपवण्यात आलं आहे. फ्रेंचायसी मालक आणि व्यवस्थापनाने भविष्याच्या दृष्टीकोनातून निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. इतकंच काय तर गुजरात टायटन्सनेही हार्दिक पांड्याला ट्रेड विंडोच्या माध्यमातून मुंबईकडे सुपूर्द केलं आहे. मात्र असं सर्व असताना हार्दिक पांड्या आणि रोहित शर्माच्या फॅन्समध्ये सोशल मीडियावर कलगीतुरा रंगला आहे. रोहित शर्माचं कर्णधारपद गेल्याचं फॅन्सना पचवणं कठीण जात आहे. दुसरीकडे, हार्दिक पांड्याची छाप जितकी गुजरात टायटन्समध्ये पडली होती. तितकी सुरुवातीच्या सामन्यात पडताना दिसली आनाही. इतकंच काय तर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने पहिला सामना गमावला आहे. गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा 6 धावांनी पराभव केला. त्यामुळे हार्दिक पांड्याला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा रोहित शर्माकडे मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद सोपवावं अशी मागणी होत आहे. आता ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू टॉम मूडी यांनी आपलं मत मांडलं आहे.
टॉम मूडीने सांगितलं की, “मुंबई इंडियन्सने पहिला सामना गमवल्यानंतर घाबरण्याची गरज नाही. नव्या कर्णधाराला थोडा वेळ देणं गरजेचं आहे. पाच किंवा आठ सामन्यानंतर अचानक हार्दिक पांड्याकडून कर्णधारपद रोहित शर्माकडे आलं तर आश्चर्य वाटेल. मुंबई इंडियन्सने पुढचा विचार करूनच हार्दिकला जबाबदारी सोपवली आहे. हार्दिक पांड्यामध्ये नेतृत्व करण्याचे सर्व गुण आहेत. त्याला थोडा वेळ देणं गरजेचं आहे.” टॉम मूडी यांचे एकंदरीत मत पाहता हार्दिक पांड्याकडे मुंबई इंडियन्सचं नेतृत्व राहील. त्यामुळे रोहित शर्माच्या फॅन्सचा हिरमोड होऊ शकतो.
आयपीएलमधील पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सकडून मुंबई इंडियन्सला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. हार्दिक पांड्या दुखापतीनंतर या क्रिकेट मैदानावर परतला आहे. पण हार्दिक पांड्या आपली छाप सोडण्यास अयशस्वी ठरला. गोलंदाजी आणि फलंदाजीत फ्लॉप ठरला. हार्दिक 3 षटकं टाकत 30 धावा दिल्या आणि एकही गडी बाद करता आला नाही. तर फलंदाजीत फक्त 11 धावा केल्या. मात्र रोहित शर्मा पहिल्याच सामन्यात हिट ठरला. त्याने गुजरात टायटन्स विरुद्ध 45 धावांची आक्रमक खेळी केली.
टिप्पणी पोस्ट करा