Salman Khan : ‘टायगर’ या चित्रपटासाठी सलमान खानची निवड कशी ; दिग्दर्शकांनी सांगितले किस्से

 

ब्युरो टीम : काही कलाकार अत्यंत सहजपणे भूमिका साकारतात तर काहीजण भूमिका आत्मसात करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतात. एखाद्या भूमिकेला यशस्वी बनवण्यामागे जितका हात कलाकारांचा असतो तितकाच दिग्दर्शक, लेखक आणि कास्टिंग डायरेक्टर्सचाही असतो. बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबडा याविषयी एका पॉडकास्टमध्ये मोकळेपणे व्यक्त झाला. ‘मॅशेबल इंडिया’च्या या पॉडकास्टमध्ये मुकेश छाबडासोबत दिग्दर्शक कबीर खान, फराह खान, राज अँड डीके, हंसल मेहता आणि इम्तियाज अली यांनी विविध मुद्द्यांवर गप्पा मारल्या. यावेळी कबीर खानने अभिनेता सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या ब्रेकअपचा उल्लेख केला.

ब्रेकअपनंतर कसे होते सलमान-कतरिना?

बॉलिवूडच्या या विविध दिग्दर्शकांनी त्यांच्या चित्रपटांमधील कास्टिंगचे विविध किस्सेसुद्धा या पॉडकास्टमध्ये सांगितले. ‘टायगर’ या चित्रपटासाठी सलमान खानची कशी निवड केली, याविषयी दिग्दर्शक कबीर खानने सांगितलं. चित्रपटातील झोयाच्या भूमिकेसाठी कतरिना कैफचा विचार करत असताना आधी सलमानसोबत त्याविषयी बोलल्याचं कबीरने पुढे सांगितलं. “त्यावेळी दोघांचा ब्रेकअप झाला होता आणि ते एकमेकांसोबत अजिबात कम्फर्टेबल नव्हते”, असं तो म्हणाला.

दिग्दर्शकांनी सांगितले किस्से

यावेळी ‘फॅमिली मॅन’ या प्रसिद्ध वेब सीरिजचे दिग्दर्शक राज अँड डीके यांनीसुद्धा कास्टिंगचा किस्सा सांगितला. जर मनोज वाजपेयी यांनी भूमिकेला होकार दिला नसता तर मुख्य भूमिका पूर्णपणे वेगळी असती, असं ते म्हणाले. तर ‘हायवे’ या चित्रपटात काम करताना आलिया खूप भावूक झाली होती, असा खुलासा दिग्दर्शक इम्तियाज अली खानने केला. ‘मैं हूँ ना’ या चित्रपटातील दहशतवाद्याची भूमिका साकारण्यासाठी बरेच अभिनेते तयार नव्हते, असं दिग्दर्शिका फराह खानने सांगितलं. अखेर ही भूमिका सुनील शेट्टीच्या पदरात पडली.

मुकेश छाबडा हा हिंदी सिनेसृष्टीतील अत्यंत प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर आहे. त्याने नुकतंच शाहरुख खानच्या ‘डंकी’ या चित्रपटासाठी काम केलं होतं. मुकेशचा स्वत:चा ‘चमक’ हा पहिलावहिला चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने