ब्युरो टीम : अभिनेत्री सारा अला खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते. ‘केदारनाथ’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आलेली सारा आता देखील एका मोठ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. जुन्या एका मुलाखतीत सारा हिला राजकारणात प्रवेश करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर अभिनेत्रीने स्पष्ट होकार दिला दिला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सारा अली खान हिची चर्चा रंगली आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या निर्णयावर प्रतिक्रिया देत आहेत.
एका मुलाखतीत सारा राजकारणात प्रवेश करणार का? असा प्रश्न अभिनेत्रीला विचारण्यात आला. यावर सारा म्हणाली, ‘हो… ती राजकारणात प्रवेश करु शकते…’ सध्या सर्वत्र साराच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे. साराने राजकारणात प्रवेश केल्यानंतर चाहत्यांनी देखील आनंद व्यक्त केला आहे.
सांगायचं झालं तर, रेडिटवर सारा अली खान हिचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, ‘ही लोकं कोणतंच क्षेत्र सोडणार नाहीत…’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘सारा आजी रुखसाना सुल्तान यांच्या पाऊलावर पाऊल ठेवणार असे चिन्ह दिसत आहे.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘सारा अली खान खूप चांगलं बोलते, ज्याची मदत तिला राजकारणात होईल…’
अन्य एक नेटकरी साराच्या व्हिडीओवर कमेंट करत म्हणाला, ‘हेमा मलिनी, रेखा, जया बच्चन, कंगना रनौत राजकारणात प्रवेश करु शकतात तर, सारा अली खान देखील करू शकते…’ सांगायचं झालं तर, बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी झगमगत्या विश्वात स्वतःचं स्थान निर्माण केल्यानंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.
सारा हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री कायम सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सारा फक्त तिच्या सौंदर्यामुळे आणि अभिनयामुळे नाहीतर स्वभावामुळे देखील अनेकांना आवडते. सध्या अभिनेत्री ‘मर्डर मुबारक’ आणि ‘ऐ वतन मेरे वतन’ सिनेमामुळे चर्चेत आहे.
कंगना रनौतचा राजकारणात प्रवेश
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौत हिला हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपाने उमेदवारी जाहीर केली आहे. बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केल्यानंतर अभिनेत्रीने स्वतःचा मोर्चा राजकारणाकडे वळवला आहे. वादाचं मुकूट कायम स्वतःच्या डोक्यावर मिरवणाऱ्या कंगनातं राजकीय करियर कसं असेल पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. कंगनाच्या आधी अनेक अभिनेत्री आणि अभिनेत्यांनी राजकारणात प्रवेश केला आहे.
टिप्पणी पोस्ट करा