Shirur Lok sabha Election : लोकसभेसाठी पुण्यातील दोन मतदारसंघातील उमेदवार ठरले; या मातब्बर नेत्यांमध्ये होणार लढाई

 

ब्युरो टीम : बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार  तर शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवाजीराव आढळराव पाटील  यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता केला जात आहे. पक्षाकडून करण्यात आलेल्या सर्व्हे मध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांचं पारड जड असल्याने त्यांनाच संधी मिळणारं असल्याची सूत्रांची माहिती आहे. तसेच आढळराव पाटील हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असून त्याची तयारीही झाली असल्याची माहिती सुत्रांनी दिली. 

राष्ट्रवादी पक्षाकडून शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नावावर लवकरच शिक्कमोर्तब होणार आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातील आमदारांची आपल्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार असावा ही मागणी केल्याने आता आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी प्रवेशाची तयारी केल्याची माहिती आहे. 

बारामतीमध्ये नणंद विरूद्ध भावजयामध्ये लढत

बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून सुप्रिया सुळे या लढणार असल्याचं स्पष्ट आहे. त्यांच्याविरोधात आता अजित पवारांनी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. बारामतीमध्ये त्यांची उमेदवारी अद्याप जाहीर झाली नसली तरीही त्यांचं नाव अंतिम झाल्याची माहिती आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत नणंद विरूद्ध भावजया अशीच लढत पाहायला मिळणार आहे. सुनेत्रा पवारांनी बारामतीमध्ये गाठीभेटी घ्यायला सुरूवात केली आहे. 

शिरूरमध्ये कोल्हेंना पाडण्याचा अजित पवारांचा निश्चय

राज्यातील हाय होल्टेज निवडणुकींमध्ये शिरूर मतदारसंघाचा समावेश होतो. कारण या ठिकाणचे खासदार अमोल कोल्हे हे शरद पवारांच्या सोबतीने आहेत. त्यामुळे त्यांना यावेळी कोणत्याही परिस्थितीत पाडणार असा निश्चय अजित पवारांनी केला आहे. अजित पवारांनी या मतदारसंघावर दावा केला असून त्या ठिकाणी त्यांनी गाठीभेटीही सुरू केल्या आहेत. 

शिरूरमध्ये शिवसेना शिंदे गटाचे शिवाजीराव अढळराव पाटील हे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. अजित पवारांकडे सध्या तरी कोणताही उमेदवार नसल्याने अढळरावांनी राष्ट्रवादीमध्येर प्रवेश करण्याची तयारी ठेवली आहे आणि त्या माध्यमातून निवडणुकीचीही तयारी सुरू केली आहे.

या आधी अढळरावांना पुणे म्हाडाचे अध्यक्षपद देऊन त्यांच्या उमेदवारीचा पत्ता कट केल्याचं सांगितलं जात होतं. पण आता अढळरावांनी थेट राष्ट्रवादीच्या प्रवेशाची तयारी केल्याने या ठिकाणाहून त्यांचं नाव अंतिम झाल्याचं सांगितलं जातंय.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने