shreya ghoshal : बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल एका गाण्यासाठी घेते एवढे मानधन

 

ब्युरो टीम : श्रेया घोषाल ही बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका आहे. प्रत्येकजण तिच्या आवाजाचे वेडे आहेत. बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या गायकांमध्ये श्रेयाच्या नावाचा समावेश होतो. श्रेया केवळ तिच्या आवाजासाठी नव्हे तर तिचं विनम्र वागणं, तिच मधुर हास्य आणि सौंदर्यासाठीही प्रसिद्ध आहे. बॉलीवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रीही तिच्या सौंदर्यापुढे फिक्या ठरतात. ऐश्वर्या राय पासून ते कतरिना कैफपर्यंत अनेक अभिनेत्रींनी तिच्या आवाजातील गाण्यावर अप्रतिम डान्स केला आहे. तिने इंडस्ट्रीमध्ये अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत.

रिपोर्ट्सनुसार, श्रेया घोषाल ही सर्वाधिक मानधन घेणारी गायिका असून ती प्रचंड श्रीमंतही आहे. तिचं नेटवर्थ 180 ते 185 कोटी इतकं आहे. जादूभऱ्या आवाजाच्या साथीने श्रेयाने बॉलिवूडमध्ये बऱ्याच काळापासून अधिराज्य गाजवलं आहे. तिची गाणी रसिकांच्या कानावर पडत नाहीतर ती त्यांच्या हृदयात वसतात. ही सुंदर गाणी गाण्यासाठी श्रेया तितकच तगडं मानधन घेते. एका गाण्यासाठी ती किती फी आकारते माहीत आहे का ?

इंस्टाग्राम रील्सवर रिहानाच्या शोचा फिव्हर अजूनही चढला आहे. रिहानाच्या शो रेटची, फी ची देखील होत असते. पण श्रेया ही रिहानाच्या तोडीस तोड आहे. किंबहुना तिच्यापेक्षा सरसच म्हणावा. रिपोर्टनुसार, श्रेया घोषाल एका गाण्यासाठी मोठी रक्कम आकारते. चित्रपटातील एका गाण्यासाठी श्रेया तब्बल 25 लाख रुपये आकारते. अंबानींच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये रिहानाने तर परफॉर्म केलंच, पण श्रेयाचाही जोरदार परफॉर्मन्स होता. या कॉन्सर्टमध्ये श्रेया घोषालने आपला सोलो परफॉर्मन्स दिला. याशिवाय तिने अरिजित सिंगसोबतही काही गाणी गायली.

200 हून अधिक गाणी गायली

टेलिव्हिजन सिंगिंग रिॲलिटी शो ‘सा रे ग मा पा’मधून श्रेया घोषालने सुरूवात केली होती. त्यामुळे तिचं नशीब उजळलं. बॉलिवूडमधील नामवंत दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना तिचा आवाजा खूप आवडला. आणि त्यांनीच तिला त्यांच्या ‘देवदास’ चित्रपटात गाण्याची पहिली संधी दिली. या चित्रपटाद्वारे श्रेया घोषालने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आतापर्यंत श्रेयाने बॉलिवूडमध्ये 200 हून अधिक गाणी गायली आहेत. ‘चिकनी चमेली’, ‘सिलसिला ये चाहत का’, ‘बैरी पिया’, ‘मेरे ढोलना सुन’, ‘ये इश्क हाए..’ अशी तिची अनेक सुमधुर गाणी प्रसिद्ध आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने