ब्युरो टीम : सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघातून काँग्रेसकडून प्रणिती शिंदे उमेदवार आहेत. या मतदार संघात सत्ताधारी भाजप हॅट्ट्रीक करण्याच्या तयारीत आहेत. यामुळे भाजपने प्रणिती शिंदे यांच्या विरोधात तगडा उमेदवार दिला आहे. आमदार राम सातपुते उमेदवारी दिल्यामुळे ही लढत अधिकच रंगतदार होणार आहे. या बाबतची सुरुवात प्रणिती शिंदे यांनी आपल्या ट्विटमधून केली. त्यांनी शालजोडीतले टोमणे मारले राम सातपुते यांना मारले आहे. शाब्दीक फटकारले लगावले आहे. उपदेश केला आहे. उपरे म्हणत डिवचले आहे. प्रणिती शिंदे यांच्या पत्राद्वारे स्थानिक विरुद्ध उपरा असा संघर्ष पाहायला मिळणार आहे. आता प्रणिती शिंदे यांना राम सातपुते काय उत्तर देतात? याची चर्चा रंगली आहे.
काय आहे प्रणिती शिंदे यांच्या पत्रात
सोलापूर काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी ट्वीटद्वारे भाजपचे उमेदवार राम सातपुते यांचे स्वागत केले आहे. परंतु स्वागत करताना डिवचले आहे. प्रणिती शिंदे यांच्या पत्राद्वारे स्थानिक विरुद्ध उपरा विषय काढला आहे. त्यांनी म्हटले आहे की, राम सातपुतेजी, आपलं सोलापूर लोकसभेच्या निवडणूक रिंगणात स्वागत आहे. सोलापूर शहर आणि जिल्हा हा नेहमीच आपली मतं मांडण्याची मुभा मिळते. मग तो इथला असो की बाहेरचा. लोकांचे प्रश्न, समस्या मतदारसंघाचा विकास हे मुद्दे निवडणुकीच्या केंद्रस्थानी असावेत. पुढील 40 दिवस आपण विचारांची लढाई लढत एकमेकांविरुद्ध उभे राहू आणि समाजात फूट न पाडता समाजाचा विकास होण्यासाठी लढाई लढू अशी मी आशा करते.
राम सातपुते कोण आहेत
माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. ते फक्त ३४ वर्षांचे आहे. सातपुते यांचा प्रवास संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असा झाला आहे. अभविपमध्ये ते प्रदेश महामंत्री होते. भाजयुमोचे राज्य उपाध्यक्ष होते. ते मूळ बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील डोईठाण येथील आहेत. २०१९ विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना माळशिरस राखीव मतदारसंघात उमेदवारी दिली. ते निवडून आले.
आता राम सातपुते उमेदवार
डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी हे २०१९ मध्ये भाजप तिकीट निवडून आले होते. त्यापूर्वी २०१४ मध्ये भाजप उमेदवारच निवडून आले. यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा सलग दोनवेळा पराभव झाला. आता प्रणिती यांच्यासमोर वडिलांच्या पराभवाचे परतफेड करण्याचे आव्हान आहे. दुसरीकडे राम सातपुते यांच्यासमोर भाजपचे हॅट्ट्रिक करण्याचे आव्हान आहे.
टिप्पणी पोस्ट करा