BJP : आज भाजप 400 पार म्हणतोय पण भाजपच्या पहिल्या निवडणुकीतील विजयी उमेदवार तुम्हाला माहित आहे का ?

 



ब्युरो टीम : भाजपने आता ४०० पारचा नारा दिला आहे. गेल्या दहा वर्षांपासून भाजपला पूर्ण सत्ता मिळाली आहे. भाजपची ही वाटचाल २ सदस्यांवरुन सुरु झाली होती. १९८४ मध्ये काँग्रेसची लाट असताना भाजपला दोन जागा मिळाल्या होत्या. परंतु त्यावेळी ना अटलबिहारी वाजपेयी, ना लालकृष्ण आडवाणी निवडून आले होते. निवडून आलेले डॉ. ए.के. पटेल आणि चंदूपतला जंगा रेड्डी हे होते. त्यावेळी भाजप हिंदुत्वाच्या मुद्यावर निवडणूक लढवत नव्हते. त्यानंतर १९८९ मध्ये भाजपने राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला. तसेच हा मुद्दा आपल्या जाहीरनाम्यात घेतला. मग लोकसभेत दोन सदस्यावरुन ८५ सदस्यांवर भाजप पोहचली. १९९१ मध्ये राम मंदिर निर्माणसाठी आंदोलन झाले. त्यानंतर भाजपची लोकसभेतील सदस्यसंख्या १२० वर गेली. १९९६ मध्ये लोकसभेत भाजपचे १६१ सदस्य झाले. १९९८ मध्ये १८२ जागांवर भाजपला यश मिळाले. २००४ आणि २००९ मध्ये भाजपचा आकडा कमी झाला. परंतु २०१४ मध्ये मोदी फॅक्टरमुळे भाजप २८२ जागांवर जाऊन पोहचले. २०१९ मध्ये भाजपला ३०० पेक्षा जास्त जागा मिळाल्या. आता २००४ मध्ये ४०० पार जाणार का? हे ४ जून रोजीच स्पष्ट होणार आहे.

१९८४ मध्ये कोण निवडून आले होते

१९८४ मध्ये गुजरातमधील मेहसाणा लोकसभा मतदार संघातून डॉ. ए.के. पटेल आणि आंध्र प्रदेशातील हनमकोंडा मतदार संघातून चंदूपतला जंगा रेड्डी विजयी झाले होते. मेहसाणामध्ये १९८० मध्ये काँग्रेसचे मोतीभाई चौधरी विजयी झाले होते. परंतु १९८४ मध्ये काँग्रेसची लाट असताना त्यांचा पराभव झाला. त्यानंतर पटेल यांना कोणी पराभूत करु शकले नाही. तसेच मोतीभाई चौधरी ज्या हनमकोंडा जागेवरुन विजयी झाले होते, त्याठिकाणी प्रथमच भाजपचा विजय झाला. त्यापूर्वी ही जागा तेलगू देसम पार्टी आणि काँग्रेसकडे होती.

भाजपचे १९८४ मध्ये विजयी झालेले दोन्ही सदस्य

दक्षिण भारतात १९८४ मध्येच कमळ

भाजपला उत्तर भारतीयांचा पक्ष म्हटला जातो. भाजप अजून दक्षिण भारतात आपले स्थान बळकट करु शकला नाही. परंतु १९८४ मध्ये भाजपला ज्या दोन जागांवर विजय मिळवला होतो, त्यात एक जागा दक्षिण भारतातील होती. आंध्र प्रदेशामधील हनमकोंडा येथून चंदुपतला रेड्डी विजयी झाले होते. १९८४ नंतर भाजपचा या लोकसभा मतदार संघात पराभव झाला होता. १९८९ आणि १९९६ मध्ये काँग्रेसला विजय मिळाला होता. १९९८ मध्ये तेलगू देसम पक्षाचा विजय झाला. त्यानंतर २००४ मध्ये तेलंगणा राष्ट्र समितीचा उमेदवार विजयी झाला.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने