ब्युरो टीम : काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी मृत्यूनंतर लोकांची अर्धी संपत्ती सरकारकडे कर स्वरूपात जमा करण्याचा कायदा करण्याची भाषा केली, यासाठी त्यांनी अमेरिकन कायद्याचा हवाला दिला आहे. राहुल गांधी यांनी नागरिकांच्या मालमत्तेचे सर्वेक्षण करून त्याचे समान वितरण करण्याचे आश्वासन दिले असतानाच पित्रोदा यांचे वक्तव्य आले आहे.
मीडियाशी बोलताना ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख सॅम पित्रोदा म्हणाले, “अमेरिकेत वारसा कर आहे. जर एखाद्या व्यक्तीकडे 100 दशलक्ष डॉलर्स असतील तर त्याच्या मृत्यु नंतर त्यातील फक्त 45% संपत्ती आपल्या मुलांना देऊ शकतो, तर 55% संपत्ती ही सरकारी तिजोरीत जमा होते. या कायद्यानुसार तुम्ही तुमच्या काळात संपत्ती निर्माण केली तर किमान अर्धा भाग जनतेसाठी सोडला पाहिजे, हे मला परिपूर्ण वाटते."
याबाबत बाजू मांडताना सॅम पित्रोदा म्हणाले, "भारतात असा कोणताही कायदा नाही, भारतात जर कोणाकडे 10 बिलियन डॉलर्स (सुमारे 82,000 कोटी) असतील आणि तो मेला तर त्याच्या मुलांना संपूर्ण 10 बिलियन डॉलर्स मिळतील." आहेत. त्यातून जनतेला काहीच मिळत नाही असे काही मुद्दे आहेत ज्यावर चर्चा आणि विचार केला जाईल. जेव्हा आपण संपत्तीचे पुनर्वितरण करण्याबद्दल बोलतो तेव्हा याचा अर्थ नवीन कायदे आणि धोरणांबद्दल बोलणे असा होईल.”
सॅम पित्रोदा यांनी आरोप केला आहे की, भारतातील लोक आपल्या नोकरांना पैसे वाटून देत नाहीत तर ते पैसे दुबई आणि परदेशात फिरण्यासाठी वापरतात. काँग्रेस सत्तेत आल्यास नोकर आणि घरकामगारांना किती पैसे द्यायचे याचेही नियम बनवणार असल्याचे ते म्हणाले.
उल्लेखनीय आहे की, काँग्रेस नेते राहुल गांधी सातत्याने देशातील जनतेच्या मालमत्तेच्या सर्वेक्षणाबाबत बोलत आहेत. काँग्रेसच्या जाहीरनाम्यातही या सर्वेक्षणाबाबत बोलले गेले आहे. सर्वेक्षणानंतर मालमत्तेचे पुनर्वितरण केले जाईल, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे. राहुल गांधी आणि काँग्रेसच्या या निवडणुकीच्या अजेंड्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हल्लाबोल केला आहे. काँग्रेसच्या मालमत्ता वितरण योजनेबाबत सोशल मीडियावर जोरदार विरोध होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा