ब्युरो टीम: महायुतीमध्ये नाशिक लोकसभेच्या जागेचा तिढा अजून सुटत नाहीय. त्यात पंकजा मुंडे यांनी एक वक्तव्य केलय, त्यामुळे महायुतीमध्ये संभ्रम, गोंधळ अधिक वाढू शकतो. पंकजा मुंडे यांना भाजपाने बीडमधून उमेदवारी दिली आहे. त्या महायुतीच्या उमेदवार आहेत. त्यांच्यासमोर महाविकास आघाडीच्या बजरंग सोनावणे यांचं आव्हान आहे. बीडमध्ये पंकजा मुंडे यांनी प्रीतम मुंडेंसंदर्भात वक्तव्य केलं. त्यामुळे महायुतीमधल्या शिवसेना, राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये अस्वस्थतात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. बीडमधून पंकजा मुंडे निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे त्यांच्या भगिनी प्रीतम मुंडेंच काय? हा प्रश्न निर्माण होतो. मागच्या 10 वर्षांपासून प्रतीम मुंडे बीडमधून खासदार आहेत. पंकजा मुंडेंच्या उमेदवारीमुळे त्या विस्थापित झाल्या आहेत.
पंकजा मुंडे यांनी काल प्रीतम मुंडेंना मी नाशिकमधून उभं करेन असं वक्तव्य केलं. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या. आज अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. त्यांना, पंकजा मुंडे यांनी प्रीतम मुंडेंना नाशिकमधून उमेदवारी देण्याविषयी वक्तव्य केलं, त्यावर पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली. त्यावर छगन भुजबळ म्हणाले की, “पंकजा मुंडे यांनी आपल्या निवडणुकीत लक्ष द्यावे. आमच्याकडे उमेदवार नाहीत असे नाही. नाशिकमध्ये खूप उमेदवार आहेत. पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये लक्ष द्यावे”
‘भुजबळांची खूप अवहेलना होत आहे’
“आमच्याशी भुजबळांची काही चर्चा झालेली नाही. मात्र, तिकडे त्यांची खूप अवहेलना होत आहे, त्यांची काळजी वाटते” असा जयंत पाटील यांनी छगन भुजबळांना टोला लगावला. “एकनाथ खडसे यांचा विचार झाला आहे भाजपमध्ये जाण्याचा, आता भाजपचे टाईमटेबल बघून त्यांचा पक्षप्रवेश होईल कदाचित. शरद पवारांनी कधीही कोलांटया उड्या मारल्या नाहीत, उलट तुम्ही किती कोलांट्या मारल्या हे आम्हाला माहिती आहे” असं जयंत पाटील म्हणाले.
टिप्पणी पोस्ट करा