ब्युरो टीम : बद्धकोष्ठता हा आजार इतका सामान्य झाला आहे की अनेकजण त्याकडे सहसा लक्ष
देत नाहीत. या आजाराकडे दुर्लक्ष करण्यास बहुतांशजण प्राधान्य देतात. परंतु या आजारावर
वेळीच उपचार न केल्यास ती मोठी समस्या होऊ शकते. पण तुम्हाला माहिती आहे का, घरगुती
उपायाने सहज दूर करू शकता.
बद्धकोष्ठता ही अशी
समस्या आहे की ज्यामुळे संपूर्ण दिवस खराब जातो. बद्धकोष्ठतेमुळे पोट रिकामे
होण्यात अडचण येते, पोट नेहमी भरलेले आणि फुगलेले वाटते. कधीकधी यामुळे
पोटदुखी, गॅस, मळमळ आणि करपट ढेकर यासारख्या समस्याही उद्भवतात. पण बद्धकोष्ठतीची समस्या
दूर व्हावी, यासाठी आता विविध औषधेही उपलब्ध आहेत. पण या औषधांमुळे
समस्या सुटेलच असं नाही. बऱ्याचवेळा तर औषधे बंद केल्यावर ही समस्या पुन्हा सुरू
होते. अशावेळी एका घरगुती उपायाने तुम्ही बद्धकोष्ठता दूर करू शकता. चला तर,
हा उपाय नेमका काय आहे, ते जाणून घेऊ.
ओट्स पावडरचा असाही
फायदा
ओट्समध्ये
व्हिटॅमिन-बी, लोह, झिंक आणि मॅग्नेशियम यासारखे पोषक घटक आढळतात. तसेच यामध्ये भरपूर फायबर
देखील असते, ज्यामुळे पोट साफ राहण्यास मदत होते. बद्धकोष्ठतेच्या
समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही पोळी तयार करण्यासाठी पीठ मळताना त्यात ओट्स टाकणे
फायदेशीर ठरते.
हे लक्षात ठेवा
ओट्स बारीक करून
त्याची पावडर बनवा. त्यानंतर जेव्हा तुम्ही पोळ्या बनवण्यासाठी पीठ मळून घ्याल, तेव्हा
त्यात ओट्स पावडर टाका. त्यानंतर त्यापासून पोळी बनवा. या पिठापासून बनवलेल्या
पोळीचं सेवन केल्यानं बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत होते. तसेच बल्ड शुगर लेव्हल
नियंत्रित ठेवण्यास देखील फायदा होतो.
टिप्पणी पोस्ट करा