टी 20 वर्ल्ड कप 2024 साठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून भारताच्या 'या' ऑलराउंडर खेळाडूची निवड
ब्युरो टीम : आयपीएलच्या 17 व्या मोसमादरम्यान क्रिकेट विश्वातून अतिशय मोठी आणि भारतासाठी अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. आयसीसी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेला अवघ्या काही दिवसांनी सुरुवात होणार आहे. आयसीसी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन हे 1 ते 29 जून दरम्यान अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये संयुक्तरित्या करण्यता आलं आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत. या 20 संघांना 5-5 नुसार 4 गटात विभागण्यात आलं आहे. या सर्व 20 संघांना वर्ल्ड कपसाठी आपल्या खेळाडूंची नावं 1 मे पर्यंत जाहीर करायची आहे. वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात कुणाला संधी मिळणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून आहे. तसेच कुणाला संधी द्यायची आणि कुणाला वगळायंच? असा मोठा पेच निवड समितीसमोर आहे. अशात एक मोठी बातमी समोर आलीय.
टीम इंडियाचा माजी ऑलराउंडर सिक्स किंग युवराज सिंह याची टी 20 वर्ल्ड कप 2024 साठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आयसीसीने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे.
टिप्पणी पोस्ट करा