ब्युरो टीम : इंडोनेशियात बाली येथे T20 सामना झाला. त्यात रोहमालियाने कमालीची गोलंदाजी केली. 17 वर्षाच्या रोहमालियाने आपल्या फिरकीच्या जाळ्यात मंगोलियाच्या टीमची वाट लावून टाकली. 24 एप्रिलला हा सामना खेळला गेला. रोहमालियाने मंगोलियाच्या फलंदाजांना श्वासही घेऊ दिला नाही. रोहमालियाने आपल्या डेब्यु मॅचमध्ये कमाल केली. महिला T20 इंटरनॅशनलच्या इतिहासात एक नवीन पान जोडलं. एक नवीन वर्ल्ड रेकॉर्ड बनवला.
इंडोनेशिया आणि मंगोलियाच्या महिला टीममध्ये T20 सीरीजचा पाचवा सामना खेळला गेला. त्यात ऐतिहासिक स्क्रिप्ट लिहिली गेली. या मॅचमध्ये इंडोनेशियाने पहिली बॅटिंग केली. 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 151 धावा केल्या. रोहमालियाचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना होता. तिने फलंदाजीमध्ये 13 धावांच योगदान दिलं. रोहमालिया बॉलिंगमध्ये खरी कमाल केली. मंगोलियाची महिला टीम 152 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरली होती.
हा एक नवीन इतिहास
रोहमालियाने आपल्या ऑफस्पिनच्या जाळ्यात मंगोलियन टीमला सहज फसवलं. रोहमालियाने फक्त 3.2 ओव्हर गोलंदाजी केली. यात 3 मेडन ओव्हर टाकल्या. एकही धाव न देता तिने 7 विकेट काढल्या. महिला T20 इंटरनॅशनल डेब्युमध्ये कुठलाही गोलंदाजाची ही चांगली फिगर आहे. हा एक नवीन इतिहास, नवीन वर्ल्ड रेकॉर्ड आहे.
6 T20I मॅचच्या सीरीजमध्ये क्लीन स्वीप
रोहमालियाने मंगोलियन टीमच कंबरड मोडून ठेवलं. ते 24 पेक्षा जास्त धावा नाही करु शकले. 127 धावांच्या मोठ्या फरकाने त्यांचा पराभव झाला. इंडोनेशिया आणि मंगोलियामध्ये खेळल्या गेलेल्या 5 व्या T20 मॅचमध्ये हा परिणाम दिसून आला. त्यानंतर दोन्ही टीम्समध्ये सहावा T20 आंतरराष्ट्रीय सामना सुद्धा 24 एप्रिललाच खेळला गेला. करियरच्या दुसऱ्या इंटरनॅशनल मॅचमध्ये 3 ओव्हरमध्ये 9 धावा दिल्या. पण तिला एकही विकेट मिळाला नाही. इंडोनेशियाच्या महिला टीमने मंगोलिया विरुद्ध 6 T20I मॅचच्या सीरीजमध्ये क्लीन स्वीप केलं. 6-0 ने सीरीज जिंकली.
टिप्पणी पोस्ट करा