Cricket :ऋषभ पंतचा अनोखा विश्वविक्रम; एकाच गोलंदाजाकडून सर्वाधिक धावा काढणाऱ्याच्या यादीतमिळवले पहिले स्थान

 

ब्युरो टीम : आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 40 व्या सामन्यात दिल्ली कॅपिट्लसचा कर्णधार ऋषभ पंत याने कमाल केली. नेतृत्वात शुबमन गिल याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सवर 4 धावांनी विजय मिळवला. परंतु स्वत: धमाकेधार खेळी केली. गुजरातसमोर विजयासाठी 225 धावांचे आव्हान ठेवले. परंतु गुजरातला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 220 धावाच करता आल्या. दिल्ली कॅपिट्लसचा संघ या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये 8 गुणांवर पोहचला आहे. दिल्लीच्या या विजयात कर्णधार ऋषभ पंत याच्या जोरदार फटकेबाजीचा महत्वाचा वाटा आहे. ऋषभ पंत याने 204.65 या स्ट्राइक रेटने 88 धावा केल्या. त्यात 18 चेंडूवर 62 धावा एकाच गोलंदाजाकडून वसूल केल्या. त्याच्या नावावर हा अनोखा विश्वविक्रम नोंदवला गेला. एकाच गोलंदाजाकडून सर्वाधिक धावा काढणाऱ्याच्या यादीत ऋषभ पंत पहिल्या क्रमांकावर पोहचला.

5 चौकार आणि 8 षटकार, 88 धावा

पंत याने गुजरातविरुद्ध 43 चेंडूचा सामना करत 5 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने 88 धावांची नाबाद खेळी केली. यामुळे दिल्लीचा संघ 200 पेक्षा जास्त धावा करु शकला. गुजरातविरुद्ध शानदार फलंदाजी करणाऱ्या ऋषभ पंतने एका गोलंदाजाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम केला. त्याने भारतीय वेगवान गोलंदाज मोहित शर्मा याच्या 18 चेंडूचा सामना केला. त्यात 62 धावा केल्या. या 62 धावांमध्ये सात चौकार आणि तीन षटकारांचा समावेश आहे.

जगातील कोणत्याही T20 सामन्यात एका गोलंदाजाविरुद्ध कोणत्याही फलंदाजाने केलेली ही सर्वाधिक धावा आहेत. तसेच एका डावात गोलंदाजाविरुद्ध 60+ धावा करण्याची ही पहिलाच घटना आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने