ब्युरो टीम : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा जाहीरनामा आज प्रकाशित झाला. त्यात अनेक मुद्दे मांडले, मोदींनी हे केलं नाही म्हणून आह्ला करावं लागतंय अशी टीका करत राष्ट्रवादीने हा जाहीरनामा प्रकाशित केला. त्यांच्या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चोख प्रत्युत्तर दिलं. ‘ 542 खासदारांमध्ये(जागांपैकी) जे 10 जागा लढवत आहेत, ते जाहीरनामा प्रकाशित करतायत. आम्ही यंव करू-त्यंव करू असं म्हणतात, त्यावर कुणाचा तरी विश्वास बसेल का? ‘ असा खोचक सवाल विचारत पडणवीस यांनी राष्ट्रवादी आणि पवारांवर पलटवार केला.
पुण्यात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे आज उमेदवारी अर्ज भरत असून त्यापूर्वी त्यांची प्रचार रॅली दुपारी पाडली. मोठं शक्तीप्रदर्शत करण्यात आलं.. यावेळी त्यांना पाठिंबा देण्यासाठी भाजपचे महत्वाचे नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. तेव्हा त्यांनी हे विधान करत शरद पवार आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी निवडणुकीतील विजयासंदर्भातही विश्वास व्यक्त केला.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांकडून जाहीरनामा प्रकाशित करण्यात येतो. पुण्यात आज राष्ट्रवादी शरचदंद्र पवार गटाकडून त्यांचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. त्याला ‘शपथनामा’ असे नाव देण्यात आले. जयंत पाटील यांनी शपथनाम्यातील आश्वासनांची माहिती दिली. त्याआधी त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. त्यांच्या याच टीकेला देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं.
महाराष्ट्रात किती जागा मिळणार ?
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात एकूण 48 जागा आहेत. महायुतीच्या जागावाटपाचा तिढा आता जवळजवळ सुटला आहे. गेल्या वेळेपेक्षा महायुतीली निश्चितच चांगलं यश मिळेल आणि गेल्या वेळेपेक्षा आमच्या जास्त जागा निवडून येतील असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. मात्र नक्की किती जागा जिंकणार याचा निश्चित आकडा नमूद करणं त्यांनी टाळलं. सगळं आलबेल आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार , मी आणि इतर सर्व घट पक्ष सोबत आहोत, असं सांगत महायुतीमध्ये सर्व आलबेल असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
बारामतीत बाजी कोण मारणार ?
सुप्रिया सुळेंना निवडून देणं म्हणजे राहुल गांधींना निवडून देणं. आणि सुनेत्रा पवारांना निवडून देणं म्हणजे माननीय मोदीजींना विजयी करणं हे बारामतीच्या जनतेला हे माहीत आहे की . बारामतीची जनता मोदीजींच्या पाठिशी आहे, असं सांगत फडणवीस यांनी बारामतीमध्ये सुनेत्रा पवारच जिंकतील असा विश्वास व्यक्त केला.
टिप्पणी पोस्ट करा