ब्युरो टीम : कॉमेडियन कृष्णा अभिषेकची बहीण आरती सिंहच्या लग्नात अभिनेता गोविंदाच्या उपस्थितीने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. गोविंदाच्या उपस्थितीने कृष्णा आणि त्याच्यातील तब्बल आठ वर्षांपूर्वीचा वाद मिटल्याचं म्हटलं जात आहे. कृष्णाची पत्नी कश्मीरा शाह आणि गोविंदाची पत्नी सुनीता अहुजा यांनी अप्रत्यक्षपणे एकमेकींना टोमणे मारल्याने या वादाची सुरुवात झाली होती. लग्नापूर्वीच्या कार्यक्रमात कश्मीरा म्हणाली होती की गोविंदा आरतीच्या लग्नात आले तर मी त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेईन. म्हटल्याप्रमाणेच जेव्हा गोविंदाने लग्नाला हजेरी लावली तेव्हा सून कश्मीरा त्यांच्या पाया पडायला गेली. गोविंदा जरी वाद बाजूला ठेवून भाचीच्या लग्नाला उपस्थित राहिले असले तरी त्याची पत्नी सुनीता या लग्नात कुठेच नव्हती. त्यावर कश्मीराने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रतिक्रिया दिली आहे.
‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत कश्मीरा म्हणाली, “लग्नात पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी मीच उभी होते आणि कृष्णा स्टेजवर आरतीसोबत होता. जेव्हा गोविंदा तिथे आले, तेव्हा त्यांना पाहून मला खूप आनंद झाला आणि मी त्यांना वाकून नमस्कार केला. त्यानंतर मी त्यांना स्टेजकडे घेऊन गेले. स्टेजवर जेव्हा मी त्यांच्या पाया पडण्यासाठी खाली वाकले, तेव्हा त्यांना मला थांबवलं आणि म्हणाले, “जीते रहो, खुश रहो.” मी त्यांच्या पाया पडायला वाकले म्हणजे एका अर्थाने मी त्यांची माफीच मागितली आहे.”
कृष्णा आणि कश्मीरा यांना जुळी मुलं आहेत. त्यांचीही भेट तिने गोविंदाशी करून दिली. गोविंदाने मुलांना मिठी मारली आणि त्यांना आशीर्वाद दिला तेव्हा कश्मीरासुद्धा भावूक झाली होती. कौटुंबिक वाद विसरून आरती सिंहच्या लग्नाला गोविंदा उपस्थित राहिले असले तरी त्याची पत्नी सुनीता लग्नापासून दूरच राहिली. याविषयी कश्मीरा पुढे म्हणाली, “त्या लग्नाला येतील अशी मला अपेक्षा नव्हती. त्यांना रागावण्याचा हक्क आहे. मी नंतर त्यांच्याशी हा वाद मिटवण्याचा प्रयत्न करेन.”
गोविंदा-कृष्णा यांच्यात कशामुळे भांडण?
कृष्णा आणि गोविंदा यांच्यातील वाद हा कश्मीरा शाहच्या एका ट्विटमुळे सुरू झाला होता. 2016 मध्ये कृष्णा एक शो करत होता, ज्यामध्ये गोविंदाला आमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र त्याने भाच्याच्या शोमध्ये जाण्यास नकार दिला होता. त्यानंतर कृष्णाची पत्नी आणि अभिनेत्री कश्मीराने एक ट्विट केलं होतं. ‘काही लोक पैशांसाठी डान्स करतात’, असं तिने ट्विटद्वारे टोमणा मारला होता. गोविंदाची पत्नी सुनिताला असं वाटलं की कश्मीराने हे ट्विट त्यांच्या कुटुंबीयांसाठी केलंय. यानंतर दोन्ही कुटुंबीयांमध्ये तणाव निर्माण झाला.
टिप्पणी पोस्ट करा