IPL 2024 : मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना ; कोण मारणार बाजी

 

ब्युरो टीम : आयपीएल स्पर्धेतील 29वा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होत आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना होणार आहे. विशेष म्हणजे दोन्ही संघांनी आयपीएलच्या इतिहासात पाचवेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. चेन्नई सुपर किंग्सने 5 पैकी 3 सामन्यात विजय मिळवला आहे. तर मुंबई इंडियन्सने 5 पैकी 2 सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे या सामन्यात विजय मिळवून प्लेऑफच्या दिशेने कूच करण्याची संधी मुंबई आणि चेन्नई संघाला आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे संघ 36 वेळा आमनेसामने आले आहेत. यात 20 वेळा मुंबई इंडियन्सने, तर 16 वेळा चेन्नई सुपर किंग्सने विजय मिळवला आहे. वानखेडे स्टेडियममध्ये दोन्ही संघ 11 वेळा आमनेसामने आले आहेत. यात मुंबई इंडियन्सने 7 वेळा आणि चेन्नई सुपर किंग्सने 4 वेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. चेन्नई संघात वानखेडेचा अंदाज असलेले ऋतुराज गायकवाड, तुषार देशपांडे, शार्दुल ठाकुर आणि अजिंक्य रहाणे आहेत. त्यामुळे ही लढत तूल्यबळ असणार आहे.

वानखेडे मैदानाचा परीघ कमी असल्याने फलंदाजीला पूरक आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीला प्राधान्य दिलं जाईल. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना फिरवण्याची ताकद काही खेळाडूंमध्ये आहे.चेन्नईचे सहा आणि मुंबई इंडियन्सच्या पाच खेळाडूंचा समावेश आहे. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड, मोईन अली, रवींद्र जडेजा, दीपक चाहर, शार्दुल ठाकुर आणि तुषार देशपांडे हे खेळाडू आहेत. तर मुंबईकडून इशान किशन, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, रोहित शर्मा यांची नावं आघाडीवर आहेत.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी, श्रेयस गोपाल, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्झी.

चेन्नई सुपर किंग्स: ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, समीर रिझवी, रवींद्र जडेजा , एमएस धोनी (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, दीपक चहर, मुस्तफिजुर रहमान, तुषार देशपांडे, मथीशा पथिराना.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने