ब्युरो टीम : आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 42 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स आमनेसामने असणार आहेत. श्रेयस अय्यर कोलकाताचं नेतृत्व करतोय. तर शिखर धवन याला दुखापत झाल्यानंतर सध्या सॅम करन नेतृत्वाची सूत्र सांभाळतोय. कोलकाताचा हा आठवा सामना असणार आहे. तर पंजाबचा हा नववा सामना आहे. केकेआरने 7 पैकी 5 सामन्यात विजय मिळवलाय. केकेआर 10 गुणांसह पॉइंट् टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. तर पंजाब किंग्सला फक्त 2 सामन्यातच विजय मिळवता आला आहे. पंजाब 4 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये शेवटून दुसऱ्या अर्थात नवव्या स्थानी आहे. त्यामुळे पंजाबसमोर केकेआरचं तगडं आव्हान असणार आहे.
केकेआर विरुद्ध पंजाब सामना केव्हा?
केकेआर विरुद्ध पंजाब सामना शुक्रवारी 26 एप्रिल रोजी होणार आहे.
केकेआर विरुद्ध पंजाब सामना कुठे?
केकेआर विरुद्ध पंजाब सामना इडन गार्डन, कोलकाता येथे होणार आहे.
केकेआर विरुद्ध पंजाब सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
केकेआर विरुद्ध पंजाब सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.
केकेआर विरुद्ध पंजाब सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?
केकेआर विरुद्ध पंजाब सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल.
केकेआर विरुद्ध पंजाब सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?
केकेआर विरुद्ध पंजाब सामना मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर फुकटात पाहायसला मिळेल.
कोलकाता नाईट रायडर्स टीम : श्रेयस अय्यर (कर्णधार), श्रीकर भारत, मनीष पांडे, रहमानउल्ला गुरबाज, रमणदीप सिंग, नितीश राणा, शेरफेन रदरफोर्ड, रिंकू सिंग, व्यंकटेश अय्यर, सुनील नरेन, अनुकुल रॉय, आंद्रे रसेल, वैभव अरोरा, दुष्मंथा चमीरा, हर्षित राणा, मुजे राणा रहमान, चेतन साकारिया, मिचेल स्टार्क, सुयश शर्मा, वरुण चक्रवर्ती, साकिब हुसेन, अंगक्रिश रघुवंशी आणि फिलिप सॉल्ट.
पंजाब किंग्स टीम : शिखर धवन (कॅप्टन), जॉनी बेअरस्टो, हरप्रीत सिंग भाटिया, प्रभसिमरन सिंग, रिली रोसो, जितेश शर्मा, सॅम कुरान, ऋषी धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंग, शिवम सिंग, सिकंदर रझा, अथर्व तायडे, ख्रिस वोक्स, अर्शदीप सिंग, राहुल चहर, नाथन एलिस, हरप्रीत ब्रार, विद्वथ कवेरप्पा, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, प्रिन्स चौधरी, आशुतोष शर्मा, विश्वनाथ सिंग आणि तनय त्यागराजन.
टिप्पणी पोस्ट करा