ipl 2024 : नाणेफेकीचा कौल मुंबई इंडियन्सच्या बाजूने; आजचा सामना कोण जिंकणार मुंबई की दिल्ली

 

ब्युरो टीम : आयपीएल 2024 स्पर्धेतील 43वा सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होत आहे. या सामन्यातील विजय दोन्ही संघांना तितकाच महत्त्वाचा आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली प्लेऑफची रेस पाहता विजय किती महत्त्वाचा आहे हे अधोरेखित होतं. या स्पर्धेत दोन्ही संघ दुसऱ्यांदा भिडत आहेत. यापूर्वी वानखेडेवर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने 29 धावांनी बाजी मारली होती. त्यामुळे आजच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स वरचढ ठरते की, मुंबई इंडियन्स बाजी मारते याची उत्सुकता आहे. दरम्यान नाणेफेकीचा कौल मुंबई इंडियन्सच्या बाजूने लागला. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने कौल जिंकत प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे.  ग्राउंड छोटं असल्याचं कारण देत हार्दिक पांड्याने प्रथम गोलंदाजीला प्राधान्य दिलं.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने सांगितलं की, “आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. मैदान लहान आहे. लहान मैदानावर दुसरी फलंदाजी करणे चांगले ठरेल. प्रत्येक खेळ हा नवा खेळ असतो. आम्ही लढत राहतो आणि प्रत्येक गेममध्ये कठोरपणे येत राहतो. मूड ठीक आहे, आनंदी गप्पा, सर्व ठीक आहे. भूतकाळात काय घडले आहे यावर आपण लक्ष केंद्रित करायची गरज नाही. कोणीही कोणालाही हरवू शकतो. आमचा ब्रँड क्रिकेट खेळणे आणि आमचे सर्वोत्तम पाऊल पुढे टाकणे हे आमचे ध्येय आहे. संघात एक बदल केला आहे.”

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने सांगितलं की, “आम्ही प्रथम फलंदाजी करण्याचा विचार करत होतो. मला वाटतं की दुसऱ्या डावात धावांचा वेग कमी होईल. हे आश्चर्यकारक आहे, आम्हाला हवे तसे विकेट मिळत आहेत. एक संघ म्हणून आम्हाला चांगले खेळायचे आहे आणि आम्ही कर आहोत.नवीन चेंडूने गोलंदाजी करणे आणि डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी करणे कठीण आहे. येथे एक ओव्हर किंवा तिकडे सर्व फरक पडतो. संघात फक्त एक बदल केला आहे.”

दोन्ही संघांची प्लेइंग 11

मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, नेहल वढेरा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, मोहम्मद नबी, पियुष चावला, ल्यूक वुड, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा.

दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): जेक फ्रेझर-मॅकगर्क, कुमार कुशाग्रा, शाई होप, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, लिझाद विल्यम्स, मुकेश कुमार, खलील अहमद.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने