IPL २०२४ : दिल्लीने मुंबईत जिंकला टॉस; कॅप्टन ऋषभ पंतने फिल्डिंगचा निर्णय सूर्याची एंट्री

 

ब्युरो टीम : आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 20 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स या संघांना आमनासामना होणार आहे. या सामन्याला मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 3 वाजता टॉस झाला. दिल्ली कॅपिट्ल्सने टॉस जिंकला. कॅप्टन ऋषभ पंतने फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. पंतने फिल्डिंगचा निर्णय घेत मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलंय.

दोन्ही संघात बदल

मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिट्ल्स या दोन्ही संघांनी आपल्या प्लेईंग ईलेव्हनमध्ये बदल केले आहेत. दिल्ली कॅप्टन ऋषभ पंत याने 2 बदल केलेत. तर हार्दिक पंड्या याने पहिल्या विजयासाठी 3 बदल केले आहेत.  रसिख डार सलाम याच्या जागी ललित यादव याला संधी देण्यात आली आहे. तर मिचेल मार्श दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. त्याच्या जागी झाय रिचर्डसन याचा प्लेईंग ईलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे.


तर मुंबई इंडियन्समध्ये सूर्यकुमार यादव याची एन्ट्री झाली आहे. सूर्याच्या एन्ट्रीमुळे नमन धीर याला बाहेर बसवण्यात आलं आहे. तर अफगाणिस्तानचा अनुभवी ऑलराउंडर मोहम्मद नबी आणि रोमरियो शेफर्ड या दोघांनाही संधी देण्यात आली आहे. नबीला डेवाल्ड ब्रेव्हिस याच्या जागी स्थान देण्यात आलंय.तर शेफर्डला मफाकाऐवजी घेतलं आहे.

मुंबई-दिल्ली हेड टु हेड रेकॉर्ड्स

मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आयपीएलच्या इतिहासात एकूण 33 वेळा आमनासामना झाला आहे. मुंबईने यात 18 सामन्यात बाजी मारली आहे. तर दिल्लीने 15 सामन्यात विजय मिळवला आहे. दिल्ली कॅपिटल्सचं गेल्या पाच सामन्यांमध्ये वरचड आहे. दिल्लीने 5 पैकी 3 सामन्यात विजय मिळवला आहे. वानखेडेवर मुंबई विरुद्ध दिल्ली दोन्ही संघ 8 वेळा भिडले आहेत.मुंबईने 5 तर दिल्लीने 3 सामन्यात विजय मिळवला आहे.

मुंबई इंडियन्स संघ : हार्दिक पंड्या (कॅप्टन), इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, नमन धीर, देवाल्ड ब्रेविस, टिळक वर्मा, पियुष चावला, टिम डेव्हिड, जेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह, आकाश मधवाल, क्वेना माफाका, रोमॅरियो शेफर्ड, नुवान तुषारा, नेहल वढेरा, शम्स मुलानी, सूर्यकुमार यादव, विष्णू विनोद, श्रेयस गोपाल, ल्यूक वुड, मोहम्मद नबी, अर्जुन तेंडुलकर, कुमार कार्तिकेय, शिवालिक शर्मा आणि अंशुल कंबोज.

दिल्ली कॅपिटल्स संघ : ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर) डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, अभिषेक पोरेल, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, रसिक दार सलाम, एनरिक नोर्टजे, इशांत शर्मा, खलील अहमद, मुकेश कुमार, कुमार कुशाग्रा, प्रवीण दुबे, जेक फ्रेझर-मॅकगुर्क, यश धुल, कुलदीप यादव, रिकी भुई, झ्ये रिचर्डसन, शाई होप, ललित यादव, विकी ओस्तवाल आणि स्वस्तिक चिकारा

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने