ब्युरो टीम: "आम्ही रणजितदादाला सांगितलं तू उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वक्ता आहेस. तू काही भाजप सोडू नको. तुझ्या मनाविरुद्ध काही करु नकोस. हा प्रवेश लांबण्याचे कारण रणजितदादा होता. त्याच्या मनात नव्हतं की, भाजपा सोडायची. त्याला म्हटलं याचा उपयोग नाही. आपण जर आता भाजपमध्ये थांबलो तर लोकांमध्ये गैरसमज निर्माण होईल. विजयदादांबद्दल गैरसमज निर्माण होईल. फडणवीस साहेबांनी तुला मंत्री करतो म्हणून आश्वासन दिलं असेल तर मुलासाठी विजयदादांनी पुतण्यावर अन्याय केला, असं बोललं जाऊ नये. तुला मंत्रिपद मिळालं नाही तरी चालेलं पण विजयदादांवर अन्याय केल्याचा ठपका येऊ नये", असं महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांनी म्हटलं.
माळशिरसमधून एक लाख 30 हजार लीड मिळणार
मला सर्वजण विचारतात ईडी, ईडी...पण आम्हाला ईडीची भिती नाही. विजयदादा ईडीला भीत आहेत, असा गैरसमज व्हायला नको. पवार साहेबांनी आम्ही धन्यवाद देणार आहोत. त्यांनी आम्हाला आयत्या वेळेला संधी दिली, उमेदवारी दिली. आमच्या मतदारसंघात तुतारीचं फार मोठा प्रमाणात प्रभाव आहे. पाच ते सहा दिवसांनंतर तुम्हाला अंदाज येईल. माळशीरसमधून एक लाख 30 हजार लीड मिळणार आहे. पवार साहेबांचा विश्वास दादांवर आहे. आमच्या राजकीय वाटचालीत पवार साहेबांनी दादांना सहकार्य केलं. पवार-शिंदे-मोहिते पाटील एकत्र आले तर 5 ते ६ मतदारसंघात फायदा होईल. मी मोठा कार्यकर्ता नाही. मात्र, जनमाणस पाहिला तर हेच चित्र आहे. भाजपपेक्षा नक्कीच जास्त येतील.
आमच्या घरातील सर्व मंडळी आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत
धैर्यशील यांच्यासोबत आमचे सर्व कार्यकर्ते प्रवेश करणार आहेत. आमच्या घरातील सर्व मंडळी आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत, पण मी राष्ट्रवादीत प्रवेश करणार नाही. माझा पक्ष एकच आहे विजयदादा..पवार साहेबांची अकलूजला सभा होणार आहे. त्या सभेत विजयदादाही प्रवेश करतील. लोकांना वाटतय ईडीला भिऊन मोहिते पाटील जातील की नाही. त्यामुळे आम्ही निश्चय केलेला आहे.
टिप्पणी पोस्ट करा