Kangana Ranavat : शिवसेनेसोबत वादानंतर अभिनेत्री कंगना रणौतला मिळणार होती गन ; पहा तिने काय केलंय खुलासा

 

ब्युरो टीम : अभिनेत्री कंगना रणौत लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. कंगना भाजपच्या तिकीटावर हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून लढत आहे. कंगनाने तिच्या प्रचारात मुसंडी घेतली आहे. आपल्या रोखठोक मतांमुळे कंगना नेहमीच चर्चेत राहिली आहे. रोखठोक मतांमुळे तिला नुकसानही सोसावं लागलं. पण ती आपल्या मतांवर ठाम राहिली. तिने कधी माघार घेतली नाही. शिवसेनेसोबतचा तिचा वाद तर सर्वज्ञात आहे. शिवसेनेसोबत वाद झाल्यानंतर तिला थेट गन मिळणार होती. तिच्या वडिलांनीच तिला गन आणून देऊ का? असं विचारलं होतं. काय होता हा रंजक किस्सा?

अभिनेत्री कंगना रणौत सध्या निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहे. प्रचार करतानाच अनेक गोष्टी बिनधास्तपणे सांगताना दिसत आहे. खासकरून शिवसेनेसोबत तिने पंगा घेतला होता. त्याबाबत तिला विचारलं जात असून तीही या विषयावर भरभरून बोलताना दिसत आहे. शिवसेनेसोबतचं कांड झाल्यानंतर मला धमक्या येत होत्या. माझ्या वडिलांकडे एक परवाना असलेलं पिस्तुल आहे. त्यांना मला येत असलेल्या धमक्यांची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी मलाही एक गन घेऊन देतो म्हणून सांगितलं. पण मला त्यांचं बोलणं फनी वाटलं. मी त्यांना गन नको म्हणाले होते, असं कंगनाने एका मुलाखतीत म्हटलंय.

घरात सर्व अधिकारी

कंगनाचे आजोबा आयएएस रँकचे अधिकारी होते. तिचे पणजोबा 10 ते 15 वर्ष आमदार होते. तिचे काका डॉक्टर आहेत तर कोणी ऑफिसर्स आहेत. कंगनालाही डेप्युटी कमिश्नर किंवा डॉक्टर बनण्याचा आग्रह करण्यात आला होता. पण तिचं सर्व लक्ष अभिनयात होतं. त्यामुळे ती अभिनय क्षेत्राकडे वळली.

लतादीदींची गाणी आवडायची

कंगना लहानपणी अत्यंत उदास राहायची. तिला गझल ऐकणं आवडायचं. कंगनाच्या आईनेही कंगना लहानपणी उदास राहायची असं सांगितलं. तू लहानपणी इतकी उदास का असायची? असा सवाल कंगनाला करण्यात आला. त्यावर तिने मजेदार उत्तर दिलं. लहान मुलांना गझल आणि कवितांशी संबंध असतो. क्रिएटिव्हली ते एकीकडेच झुकलेले असतात. पण मी उदास नसायचे. मला जुनी गाणी ऐकायला आवडायची. खासकरून लता मंगेशकर यांची गाणी ऐकायला आवडायची, असं तिने सांगितलं.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने