Leg Pain : काय सांगता! या उपायांनी पायदुखीच्या समस्येपासून मिळेल सुटका



ब्युरो टीम : सतत खुर्चीवर बसल्यानं, जास्त चालण्यामुळे किंवा पाय मुरगळणे, अशा विविध कारणांनी पायदुखीच्या समस्येचा आजकाल अनेकांना सामोरं जावं लागतं. कधीकधी तर ही वेदना खूपच सौम्य असते, व उपचाराशिवाय बरी होते. पण काहीवेळा पायदुखीची समस्या सहजासहजी दूर होत नाही. अशावेळी अनेकजण औषधांची मदत घेतात. पण आज आम्ही तुम्हाला असे काही घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्याच्या मदतीनं तुम्ही पायदुखीच्या समस्येपासून सहज सुटका मिळवू शकता. चला तर, हे उपाय जाणून घेऊ.

गरम पाणी ठरेल उपयुक्त

जेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये रक्तप्रवाह योग्यरित्या होत नाही, तेव्हा अनेकदा पाय दुखतात. अशावेळी कोमट पाण्याचा वापर करावा. गरम पाण्यानं भरलेल्या पिशवीने किंवा गरम टॉवेलनं पायाला शेक द्या. तसेच गरम पाण्यानं बादली भरून त्यात पाय बुडवून बसा.

खूर्चीवर बसताना हे लक्षात ठेवा

खुर्चीवर बसताना काळजी घेतल्यास पायदुखीची समस्या उद्भव नाही. खुर्चीवर बसताना दोन्ही पायामध्ये अंतर ठेवा. तुम्ही काम करीत असलेल्या डेस्कची उंची व तुमच्या खुर्चीची उंची एकसमान असावी. बसताना तुमची पाठ खुर्चीला चिकटलेली असावी. 

सैंधव मीठ

सैंधव मीठ हे वेदना कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. हे मीठ कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये सहज मिळते. हे मीठ गरम पाण्यात टाका, व त्यात पाय बुडवा. असं केल्यानं तुमच्या स्नायूंना आराम मिळेल, व पायदुखीची समस्या दूर होईल.

दरम्यान, घरगुती उपायांनी पायदुखीची समस्या दूर झाली नाही, व ही पायदुखीची समस्या अधिक तीव्र असेल तर अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने