ब्युरो टीम : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय. राजकीय नेते ऐकमेकांच्या गाठीभेटी घेताना दिसतायेत. अशातच माढा लोकसभा मतदारसंघाची देखील जोरदार चर्चा सुरुय. भाजपनं माढा लोकसभा मतदारसंघात पुन्हा रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी दिलीय. त्यामुळं धैर्यशील मोहिते पाटील हे नाराज आहेत. ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जातेय. दरम्यान, आज दुपारी साडेतीन वाजता मोहिते पाटील हे शरद पवारांची त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी भेट घेणार आहेत. भेट झाल्यानंतर लगेच शरद पवार हे साडेचार वाडण्याच्या सुमारास पत्रकार परिषद घेणार आहेत.
धैर्यशील मोहिते पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार?
माढा लोकसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आलाय. धैर्यशील मोहिते पाटील हे आज शरद पवार यांच्या त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी भेट घेणार आहेत. या भेटीकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, धैर्यशील मोहिते पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. प्रवेश केल्यानंतर लगेच धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा देखील होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मोहिते पाटील यांची भेट झाल्यानंतर लगेच शरद पवार हे पत्रकार परिषद घेणार आहे.
16 एप्रिलला धैर्यशील मोहिते पाटील यांचा पक्ष प्रवेश होणार
दरम्यान, धैर्यशील मोहिते पाटील हे 13 एप्रिलला शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे 13 एप्रिलला विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळं धैर्यशील मोहिते पाटील यांचा 13 एप्रिलला प्रवेश होऊ शकणार नाही. तर 16 एप्रिलला धैर्यशील मोहिते पाटील यांचा पक्ष प्रवेश होणार असून त्याच दिवशी शक्तिप्रदर्शन करत मोहिते पाटील हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळं माढा लोकसभा मतदारसंघात रणजितसिंह निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील अशी लढत होणार असल्याचं बोललं जातंय. दरम्यान, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत रणजितसिंह निंबाळकरांनी संजयमामा शिंदे यांचा पराभव केला होता. यावेळी मोहिते पाटलांनी निंबाळकरांना मोठी साथ दिली होती. मोहिते पाटलांनी माळशिरस तालुक्यातून निंबाळकरांना एक लाखाहून अधिक मताधिक्क्य दिलं होतं.
टिप्पणी पोस्ट करा