ब्युरो टीम : बीड : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा आंदोलक पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. बीडमध्ये मराठा आंदोलकांनी आज भाजपच्या लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा ताफा अडवला. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून माजलगावच्या लउळ गावात पंकजा मुंडे यांचा ताफा अडवला. आम्ही तुमचे लेकरं असं म्हणत आम्हाला न्याय द्या, अशी मागणी यावेळी मराठा बांधवांनी केली आहे. मराठा आंदोलक पंकजा मुंडे यांच्या गाडी समोर आले आणि त्यांनी रस्ता रोखून धरला. यामुळे काही काळासाठी तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं.
मराठा आंदोलकांनी पंकजा मुंडे यांचा ताफा अडवला
भाजपच्या लोकसभेच्या उमेदवार असलेल्या पंकजा मुंडे आज माजलगाव तालुक्यातील लऊळ गावात प्रचारासाठी गेल्या होत्या. यावेळी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून गावातील मराठा बांधवांनी पंकजा मुंडे यांचा ताफा काही वेळ काढून धरला. यावेळी पंकजा मुंडे स्वतः गाडीतून खाली उतरल्या आणि त्यांनी मराठा बांधवांच्या भावना ऐकून घेतल्या. मराठा बांधव आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये काही वेळ मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून चांगलाच वाद निर्माण झाला होता. तर, पंकजा मुंडे यांनी देखील मराठा बांधवांची समजूत काढत मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आपली भूमिका स्पष्ट केली. भविष्यात मराठा अरक्षणासाठी पंकजा मुंडे काय भुमिका घेणार, हे बॉण्डवर लिहून द्यावं, अशी मागणी देखील काही मराठा बांधवांनी यावेळी केली.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा आंदोलक आक्रमक
यावेळी मराठा बांधवांची समजूत काढताना पंकजा मुंडे म्हणाल्या की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवाजी महाराजांची शपथ घेऊन आरक्षण देण्याचा शब्द दिला आहे मात्र मराठा बांधवांनी एकनाथ शिंदे हे लबाड असून आमचा तुमच्यावर विश्वास आहे आम्ही तुमचे लेकरं आहोत त्यामुळे आम्हाला न्याय द्या अशी साथ देखील पंकजा मुंडे यांना घातली आम्हाला कोणताही पद नको मात्र आमच्या मुलांसाठी शैक्षणिक आरक्षण हवं अशी एकमताने गावकऱ्यांनी पंकजा मुंडे यांच्याकडे मागणी केली.
आंदोलकांच्या नेमक्या मागण्या काय?
तर गेल्या दहा वर्षांमध्ये लऊळ गावाला खासदार फंडातून एक रुपयाही मिळाला नसल्याचं गावकऱ्यांनी बोलून दाखवलं. केंद्रामध्ये मोदींची सत्ता यावी म्हणून आम्ही देखील गेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीमध्ये असताना देखील भाजपला मतदान केलं होतं आमचा हक्क जर आम्हाला मिळाला तर आम्ही आता देखील तुमच्या बाजूने उभा राहू आम्हाला आमची भूमिका मांडायची होती म्हणून आम्ही तुमच्यासमोर आलो असल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं.
टिप्पणी पोस्ट करा