ब्युरो टीम: लोकसभा निवडणूक 2024 साठी भाजपने शड्डू ठोकले. या निवडणुकीत 400 हून जागांवर विजयश्री खेचून आणण्यासाठी भाजपने आज दिल्लीत शंखनाद केला. भाजपने जाहीरनामा प्रसिद्ध केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजयचा विश्वास व्यक्त केला. त्यांनी दहा वर्षांतील सरकारच्या कामगिरीची उजळणी केली. कठोर निर्णय घेण्यासाठी बहुमतातील सरकार किती गरजेचे आहे, याचा हुंकार त्यांनी भरला. त्यांनी जाहिरनाम्यात अनेक योजनांची घोषणा केली. अनेक क्षेत्रात भाजप काय काय बदल करणार याची ओघवती माहिती त्यांनी दिली.
योजनांची उजळणी
जनधन खाते, उज्ज्वला योजना, शौचालय निर्मिती, जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद 370 समाप्त करणे, राम मंदिराची निर्मिती, तीन तलाक कायदा यांची उजळणी त्यांनी केली. महिला आरक्षणासाठी नारी शक्ती वंदन अधिनियमाची माहिती त्यांनी दिली. मोदीची गॅरंटी हाच भाजपचा संकल्प असल्याचे जाहिरनाम्यातून स्पष्ट झाले. महिला, तरुण, गरीब आणि शेतकऱ्यांवर या जाहिरनाम्यात फोकस करण्यात आले. देशातील 70 वर्षांवरील कोणत्याही ज्येष्ठ नागरिकांना आता आयुष्यमान भारत योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
काय दिली गॅरंटी
येत्या 5 वर्षांत सेवा, सुशासन आणि गरीबांच्या कल्याणाची गॅरंटी
पुझी पाच वर्षात मोफत रेशन, पाणी आणि गॅस कनेक्शन, पीएम सूर्यघर योजनेतून झिरो वीजबिल, तर अधिकची कमाई
आयुष्यमान भारत योजनेत पाच लाखांपर्यंतचे मोफत उपचार
मध्यमवर्गासाठी पक्के घर, स्वास्थ्य सेवांचा विस्तार
राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू करण्यात येणार, प्रत्येक नागरिकाला दर्जेदार शिक्षण मिळणार
2036 मध्ये भारत ऑलम्पिक स्पर्धा आयोजित करणार
तरुणांसाठी पायाभूत सुविधा, गुंतवणूक, उत्पादन, उच्च सेवा क्षेत्र, स्टार्टअप, पर्यटन आणि क्रीड क्षेत्रात रोजगाराची संधी उपलब्ध करण्यात येणार
नारी तू नारायणी अंतर्गत 3 कोटी लखपती दीदी करण्याचा संकल्प
महिला बचत गटांना सेवा क्षेत्राशी जोडण्यात येणार
महिलांना सर्व्हाईकल कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर आणि ओस्टियोपोरोसिसवर लक्ष देणार
महिलांसाठी सार्वजनिक ठिकाणी शौचालयांची व्यवस्था
नारी वंदन अधिनियम लागू करण्यात येणार
बीज ते बाजारापर्यंत शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीवर लक्ष देणार
श्रीअन्नला सुपर फूड धरतीवर पुढे आणणार
नॅनो युरिया आणि नैसर्गिक शेतीवर भर देणार
कृषी पायाभूत सोयी-सुविधांवर भर देणार
मच्छिमारांसाठी विमा, फिश प्रोसेसिंग युनिट, सॅटेलाईटद्वारे हवामानाची माहिती देणार
वन नेशन, वन इलेक्शन अंतर्गत कॉमन इलेक्टोरल रोलची व्यवस्था करणार
देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी जोरकस प्रयत्न
टिप्पणी पोस्ट करा