ब्युरो टीम : “आज मी तुमच्याकडे काही मागण्यासाठी आलो आहे. मागण्यासाठी आलोय, कारण यापुढे मला बरच काही द्यायचं आहे. मला धन, दौलत नकोय. मला यश, किर्ती नकोय. मला तुमचा आशिर्वाद हवा आहे. या निवडणुकीत तुम्ही पुढच्या पाच वर्षांसाठी विकासाची गॅरेंटी निवडालं. दुसऱ्याबाजूला ते लोक आहेत, ज्यांनी 2014 च्या आधी देशाला भ्रष्टाचार, दहशतवाद आणि कुशासनच्या गर्तेत ढकलल होतं. आपल्या कलंकित इतिहासानंतरही काँग्रेस पुन्हा देशाची सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. याना अंदाजच नाहीय, पहिल्या दोन टप्प्याच्या निवडणुकीत इंडिया आघाडीचा डब्ब गुल झालाय” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ते सोलापूर येथील सभेत बोलत होते.
“तुम्ही 10 वर्षात मोदीच प्रत्येक पाऊल पाहिलय. तुम्ही मोदीला ओळखता. दुसऱ्याबाजूला इंडिया आघाडीत नेत्याच्या नावावर महायुद्ध सुरु आहे. इतका मोठा देश, ज्याचं नाव निश्चित नाहीय, चेहरा माहित नाही, इतका मोठा देश तुम्ही त्यांच्या हातात देणार का? चुकूनही तुम्ही असं कराल का?” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. “सध्या हे लोक सत्ता मिळवण्यासाठी देशाची वाटणी करत आहेत. आता पाच वर्षात पाच पीएम हा त्यांचा फॉर्म्युला आहे. प्रत्येकवर्षी नवीन पीएम. पाच वर्षात पाच पीएम प्रत्येक वर्षी नवीन पीएम लुटणार” असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.
‘पाच पीएमच्या फॉर्म्युल्याने….’
“नकली शिवसेनावाले काय म्हणतात, त्यांच्याकडे पंतप्रधानपदासाठी भरपूर उमेदवार आहेत. एकावर्षात चार पंतप्रधान बनवले, तर काय फरक पडतो. पाच पीएमच्या फॉर्म्युल्याने इतका मोठा देश चालू शकतो का? पण त्यांना हाच एक रस्ता आता उरलाय. त्यांना तुमच्या भविष्याची चिंता नाही. त्यांना मलई खायची आहे” असा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला. “महाराष्ट्र ही सामाजिक न्यायाची भूमी आहे. तुम्ही काँग्रेसचा 60 वर्षांचा कार्यकाळ पाहिला. माझी 10 वर्ष पाहिली आहेत. मागच्या 10 वर्षात सामाजिक न्यायासाठी जितकं काम झालं, तितक स्वातंत्र्यानंतर कधीही झालं नाही. काँग्रेसने आपल्या 60 वर्षाच्या सत्ता काळात एसटी, ओबीसी यांचे हक्क रोखण्याचे प्रयत्न केले” असा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला.
मोदींनी पाहिलेलं नवीन स्वप्न काय?
“आम्ही कोणाचाही हक्क हिसकावला नाही. आमच्या समाजिक न्यायाची पद्धत समाजाला जोडण्याची आहे. आता मी ठरवलय गरीब आईच्या मुला, मुलीला डॉक्टर, इंजिनिअर बनवायच. त्यांना मोठ्या पदावर बसवायचं आहे” असं पंतप्रधान मोदी म्हणाले. “गरीब मुला-मुलींना इंग्लिश मीडियमध्ये शिक्षण घेणं शक्य आहे का? आधी मराठी मीडीयममध्ये शिक्षण घेतल्यानंतर टाळ लागायचं. पण आता असं नाहीय, तुम्ही मराठी मीडियममध्ये शिकून डॉक्टर, इंजिनिअर बनू शकता. इंग्रजी नाही आलं, तरी चालेलं तुम्ही देश चालवू शकता, हे मोदीच स्वप्न आहे” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
टिप्पणी पोस्ट करा