Nashim Khan : काँग्रेसमधील दलाल नेता ओळखा ? नसीम खान यांचे मोठे गौप्यस्फोट काय?

 

ब्युरो टीम : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नसीम खान यांनी काँग्रेसच्या स्टार प्रचारक समितीचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसने राज्यात एकाही अल्पसंख्याक समाजाच्या उमेदवाराला उमेदवारी दिली नसल्याचा निषेध म्हणून नसीम खान यांनी हा निर्णय घेतला आहे. निवडणूक काळात आपण प्रचारापासून अलिप्त राहणार आहोत. पण आमचे कार्यकर्ते काँग्रेसचा प्रचार करतील, असं सांगतानाच मी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचंही नसीम खान यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच पक्षात एक दलाल नेता असून तो इतर पक्षांशी हातमिळवणी करत असल्याचा गंभीर आरोप नसीम खान यांनी केला आहे.

काँग्रेसच्या प्रचार समितीचा राजीनामा दिल्यानंतर नसीम खान यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आपलं म्हणणं मांडलं. राजीनामा देण्यामागचं कारण सांगतानाच मोठे गौप्यस्फोटही केले. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातून अनेक लोकांनी, अल्पसंख्याक समाजाच्या अनेक संघटनांनी मला फोन करून रोष व्यक्त केला आहे. काँग्रेसने राज्यात एकाही अल्पसंख्याकाला उमेदवारी दिली नाही. याचं कारण काय? काँग्रेसची अशी काय मजबुरी आहे? असा सवाल मला या लोकांनी केला आहे, असं नसीम खान म्हणाले.

उमेदवार का दिला नाही?

तुम्ही काँग्रेसचे सीनियर नेते आहात. तुम्ही देशभर पक्षाचा प्रचार करता. काँग्रेसला मतदान करण्याची समाजाला विनंती करता. मग महाराष्ट्रात काँग्रेसचा एकही अल्पसंख्याक उमेदवार का नाही? मीही त्याला सहमत आहे. पक्षाच्या धोरणानुसार उमेदवार का दिला नाही? मराठवाड्यात अनेक लोकसभा मतदारसंघ आहेत. त्यात अल्पसंख्यांक उमेदवार देऊ शकतो. मराठवाड्यात 35 टक्के अल्पसंख्याक समाज आहे. मुंबई आणि विदर्भातही अल्पसंख्याकांची संख्या मोठी आहे. का उमेदवार दिला नाही? मी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात प्रचार केला. पण नंतरच्या टप्प्यात प्रचार करणार नाही. काँग्रेस नेतृत्वाला मी माहिती दिली आहे, असं नसीम खान म्हणाले.

मला काँग्रेसची ऑफर होती

राज्य काँग्रेसने मला दोन महिन्यापूर्वीच सांगितलं होतं की तुम्हाला लढायचं आहे. काही नेते पक्षात आहेत, त्यांना जिल्हाही सांभाळता येत नाही. हा कोण नेता आहे, त्याला मी शोधतोय. बाकीच्या पक्षाशी हातमिळवणी करून पक्षाला कमजोर करण्याचा प्रयत्न हा दलाल नेता करत आहे. हा नेता महाराष्ट्रातीलच आहे, असा दावाही त्यांनी केला. या नेत्याबद्दल मी फक्त पक्षाला माहिती देत आहे. नेतृत्वाला सांगत आहे, असं सांगतानाच नाना पटोलेहे पक्षाला मजबूत करण्याचं काम करत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने