ब्युरो टीम : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये विद्यार्थीच्या जेवण व नाष्टा च्या सोयीसाठी उपहारगृहे , फूड स्टॉल , रिफेक्टरी , भोजनगृहे , तसेच किराणा व जीवनावश्यक वस्तू विक्री केंद्र उपलब्ध आहेत. या सर्व ठिकाणी जे अन्न दिले जाते ते उत्तम दर्जाचे व पौष्टिक असावे व यासर्वावर नियंत्रण ठेवण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने प्राध्यापकांचा समावेश असलेली 'उपहारगृह व भोजनगृह दक्षता समिती' ही ७ सदस्यीय समिती गठीत केली तसेच विद्यार्थीचा समावेश असलेली 'भोजनगृह गुणवत्ता नियंत्रण समिती' गठीत केली. यामध्ये सुरूवातीला ४ सदस्यांची अर्ज प्राप्ती नंतर निवड करण्यात आली होती. विद्यापीठांमधील विविध विद्यार्थीं संघटनां व विद्यार्थीच्या मागणीनंतर इतर काही विद्यार्थी सदस्यांचा समावेश करण्यासाठी अर्ज मागविण्यात आले. परंतु त्यांवर पुढे कसलीही कारवाई झाली नाही. अगोदर चार सदस्य व नव्यानं नियुक्त सदस्य यांच्या नावाचे फलक तात्काळ लावण्यात यावे. व सध्या जे प्राध्यापक सदस्यांचे फलक लावण्यात आले आहेत त्यामध्ये संपर्क क्रमांक दिलेले नाहीत. भोजना संबंधी जर एखाद्या विद्यार्थ्याला तक्रार असेल तर तो विद्यार्थी संबंधित सदस्यांना संपर्क कसा करेल. आणि जर त्या सदस्यांना त्यांचे संपर्क क्रमांक द्यायची नसतील तर तात्काळ त्यांची हकालपट्टी करून नवीन प्राध्यापक सदस्यांना संधी देण्यात यावी. अन्यथा NSUI कडून तीव्र आंदोलन करण्यात येईल.
१) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये एकूण 13 प्रकारच्या मेस , भोजनगृह व परगृह आहेत . या सर्व ठिकाणी विद्यापीठ प्रशासनाने उपहारगृह दक्षता समितीच्या सदस्यांच्या नावाचे फलक लावलेले आहेत परंतु या फलकावरती संपर्क क्रमांक दिलेले नाहीत जर एखाद्या विद्यार्थ्याला तक्रार करायची असेल तर तो विद्यार्थी संबंधित सदस्यांची संपर्क कसा करेल ?
- अक्षय कांबळे ( सचिव महाराष्ट्र राज्य - राष्ट्रीय विद्यार्थीं काँग्रेस)
२) भोजनगृह गुणवत्ता नियंत्रण समिती मधील विद्यार्थी सदस्यांची नावे फलकावरती का टाकण्यात आले नाहीत. तसेच नव्याने सदस्य नियुक्ती संबंधी अर्ज मागविण्यात आले होते त्याची प्रक्रिया विद्यापीठ प्रशासनाने पुर्ण केलेली नाही. तात्काळ यामध्ये दुरुस्ती होणे अपेक्षित आहे.
राहुल ससाणे ( सदस्य - भोजनगृह गुणवत्ता नियंत्रण समिती )
टिप्पणी पोस्ट करा