Ram : रामाच्या नावाने मिळणार कर्ज ; या अनोख्या बँकेबद्दल जाणून घ्या

 

ब्युरो टीम : देशभरात रामनवमीचा उत्साह आहे. यंदा अयोध्यानगरीत तर अभूतपूर्व जल्लोष आहे. आज प्रभू श्रीरामांची नगरी फुलांनी सजली आहे. प्राण प्रतिष्ठेनंतर पहिल्यांदाच अयोध्येत रामनवमी साजरी करण्यात येत आहे. रामलल्लाला आज दुपारी सूर्यांच्या किरणांचा टिळा लावण्यात आला. पण या रामनगरीत एक अनोखी बँक असल्याचे तुम्हाला माहिती आहे का? या बँकेचे नाव इंटरनॅशनल सीताराम बँक असे आहे. जाणून घ्या या बँकेची काय आहे विशेषतः

5 लाख वेळा लिहा सीताराम

प्रभू श्रीरामांच्या नगरीतील या बँकेमध्ये खाते उघडण्यासाठी तुम्हाला 5 लाख वेळा सीताराम असे लिहावे लागेल. या बँकेची स्थापना 1970 मध्ये झाली होती. या बँकेत भाविकांना राम नावाचे कर्ज मिळते. या बँकेत सध्या 35000 खातेधारक आहेत. या बँकेचे ग्राहक संपूर्ण जगभर आहेत. भारताशिवाय, अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, नेपाळ, फिजी आणि युएईमध्ये पण या बँकेचे खातेदार आहेत.

20,000 कोटी सीताराम बुकलेट्स

रामनगरीतील या बँकेत 20,0000 कोटी सीताराम बुकलेट्स आहेत. भक्तांना ते देण्यात आले आहेत. अयोध्येतील राम मंदिर प्राण प्रतिष्ठेचा फायदा या बँकेला पण झाला आहे. या बँकेच्या व्यवस्थापकांच्या मते, प्राण प्रतिष्ठेनंतर या बँकेला भेट देणाऱ्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. ही बँक प्रत्येक खात्याची नोंद ठेवते. ही बँक प्रत्येक खातेदाराला मोफत बुकलेट्स आणि एक लाल पेन भेट देते. या बँकेचे खातेदार व्हायचे असेल तर तुम्हाला बुकलेटवर 5 लाख वेळा सीताराम असे लिहावे लागेल. तेव्हा तुमचे खाते उघडल्या जाते. त्यानंतर तुम्हाला पासबूक देण्यात येते. या बँकेच्या जगभर एकूण 136 शाखा आहेत.

कसे मिळते कर्ज

या बँकेत खाते उघडण्यासाठी 5 लाख वेळा सीताराम असे लिहावे लागते. या बँकेतून कर्ज पण मिळते. त्यासाठी काही अटी आणि शर्ती आहेत. तीन प्रकारचे कर्ज ही बँक देते. देशातील बँकिंग सिस्टिमप्रमाणे ही बँक काम करते. पहिले कर्ज राम नामाचे असते. दुसरे पठणाचे असते तर तिसरे लिखाणाचे असते. लेखण कर्ज उतरण्यासाठी ग्राहकाला 8 महिने 10 दिवसांचा कालावधी देण्यात येतो. ग्राहकांना सव्वा लाख वेळा राम नाम लिहावे लागते.

पैसे नाही, धर्म, शांती आणि विश्वासाचा व्यवहार

या बँकेत रुपये चालत नाही. तर राम नामाचे महत्व आहे. एका निर्धारीत कालावधीत, निश्चित कालावधीत ग्राहकाला राम नाम लिहून द्यावे लागते. या बँकेत पैशाला काहीच महत्व नाही. तर बँकेला धर्म, शांती आणि विश्वासाचा व्यवहार चालतो. या बँकेतील काही खातेदार असे आहेत की, त्यांनी 1 कोटीहून अधिक बुकलेट बँकेला लिहून दिली आहेत. तर काही भक्तांनी 25 लाखांहून अधिक वेळा सीताराम असे लिहून दिले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने