ब्युरो टीम : रोहित शर्मा आयपीएलच्या 17 व्या हंगामानंतर मु्ंबईची साथ सोडू शकतो. रोहित हार्दिकच्या कॅप्टन्सीवर नाखूश आहे, असं माध्यमांनी वृत्तात म्हटलंय. रोहित शर्मा आणि हार्दिक सिनिअर खेळाडू आहेत. रोहितने आपल्या नेतृत्वात मुंबईला 5 वेळा आयपीएल चॅम्पियन केलंय. तर दुसऱ्या बाजूला हार्दिकच्या नेतृत्वात मुंबईला विजयाचं खातंही उघडता आलेलं नाही. रोहितला क्रिकेटचा आणि कर्णधारपदाचा तगडा अनुभव आहे. मात्र आता हार्दिक मुंबईचा कॅप्टन असल्याने निर्णय घेण्याचे सर्व अधिकार हे हार्दिकला आहेत. त्यामुळे या दोघांच्या अनुभवाचा उपयोग मुंबईच्या विजयात होताना तरी दिसत नाहीय.
रोहितला पुन्हा कॅप्टन्सी मिळणार?
वृत्तानुसार, रोहितला पुन्हा कर्णधार करण्याबाबत चर्चा सुरु आहे. मात्र याआधी कॅप्टन हार्दिकला कामगिरी सुधारण्यासाठी 2 सामन्यांचा वेळ दिला जाऊ शकतो. मात्र या सर्व चर्चा आहेत. याबाबत कोणत्याही बाबतीत अधिकृत माहिती नाही.
रोहित मुंबईची साथ सोडणार असल्याची चर्चा
मुंबई इंडियन्स टीम : हार्दिक पंड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, टीम डेव्हिड, इशान किशन, विष्णू विनोद, नेहल वढेरा, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, पियुष चावला, श्रेयस गोपाल, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शम्स मुलानी, रोमॅरियो शेफर्ड, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्झी, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, नमन धीर, शिवालिक शर्मा, ल्यूक वुड आणि क्वेना माफाका.
टिप्पणी पोस्ट करा