Rohit sharma : आयपीएलच्या'या' नियमावर रोहितने ठेवले बोट; म्हणाला भारतीय संघासाठी हे धोकादायक

 

ब्युरो टीम: आयपीएल २०२४ सुरु आहे. क्रिकेटप्रेमी फटकेबाजीचा आनंद घेत आहे. क्रिकेटच्या T20 या प्रकारात नवीन नियम आणला आहे. त्या नियमावरुन भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा संतापला आहे. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू एडम गिलक्रिस्ट याला दिलेल्या मुलाखतीत रोहित शर्माने ‘इम्पॅक्ट प्लेयर रूल’ संदर्भात नाराजी व्यक्त केली. या नियमामुळे चांगल्या ऑलराउंडर खेळाडूंना संधी मिळणार नाही. या नियमाचा फटका भारतीय खेळाडू वॉशिंग्टन सुंदर आणि शिवम दुबे यांच्यासारख्या अष्टपैलू खेळाडूंना बसणार आहे.

का आहे विरोध

रोहित शर्मा याने एडम गिलक्रिस्ट याला क्लब प्रेयरी फायर नावाच्या पॉडकास्टवर मुलाखत दिली. त्या मुलाखतीत इम्पॅक्ट प्लेयर रुलचा विरोध केला. रोहित शर्मा म्हणाला, ‘मी इम्पॅक प्लेअर नियमाचा समर्थक नाही. अष्टपैलू खेळाडूंसाठी हा चांगला नियम नाही. क्रिकेट १२ खेळांडूचा नाही तर ११ खेळाडूंचा खेळ आहे. तुम्ही मनोरंजन करण्यासाठी त्याचे नियम बदलत आहात.

इम्पॅक्ट प्लेयर रूलच्या नियमामुळे सनराइजर्स हैदराबादच्या संघातील अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर याला संधी मिळत नाही. तसेच शिवम दुबे हा चेन्नई सुपर किंग्ससाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. परंतु त्याला आतापर्यंत गोलंदाजीची संधी मिळाली नाही.

काय आहे नियम

इम्पॅक्ट प्लेअरच्या नियमानुसार नाणेफेकीनंतर दोन्ही कर्णधारांना ५ पर्यायी खेळाडूंची नावे द्यावी लागतात. कर्णधाराने प्रभावशाली खेळाडू म्हणून निवडलेल्या या चार खेळाडूंमधून संघ कोणत्याही एका खेळाडूची निवड करू शकतो. फलंदाजी आणि गोलंदाजी संघ या खेळाडूचा वापर सामन्यात केव्हाही करू शकतो. हा 12वा खेळाडू मैदानात उतरताच सामन्याचा निकाल बदलू शकतो. त्याच्या आगमनानंतर अष्टपैलू खेळाडूंचे महत्त्व कमी होताना दिसत आहे.

पाकिस्तानसोबत खेळण्यास तयार

रोहित शर्मानेही मुलाखतीत पाकिस्तान क्रिकेट संघाचे कौतुक केले असून त्यांच्यासोबत खेळण्यास कोणतीही अडचण येणार नसल्याचे सांगितले आहे. रोहित म्हणाला की, ‘पाकिस्तान एक चांगला संघ आहे आणि त्यांची वेगवान गोलंदाजी उत्कृष्ट आहे. आयसीसी स्पर्धेत पाकिस्तानशी खेळणे चांगले आहे. मी फक्त क्रिकेटकडे पाहत आहे बाकी इतर मला काही माहीत नाही.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने