Yellow Teeth Problem : आता मनमोकळ्यापणाने हसा, ‘या’ उपायांनी पिवळे दात होतील पांढरे शुभ्र!



ब्युरो टीम : पांढऱ्या चमकदार दातांवर पिवळसरपणाचा थर असतो, किंवा दातांमधून दुर्गंधी येते, तेव्हा मोकळेपणानं हसताही येत नाही. तुमच्या आत्मविश्वासावरही त्याचा परिणाम होतो. तुमच्याही दातांवर पिवळसरपणाचा थर असेल, तर काळजी करू नका. कारण आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचे पिवळे दात पांढरे शुभ्र होण्यास मदत होईल.

दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय करू शकता. चला तर, हे उपाय नेमके कोणते आहेत, ते आज जाणून घेऊ

हे लक्षात ठेवा

१) दात पांढरे शुभ्र व्हावेत, यासाठी तुम्ही सफरचंदाच्या सालीचा वापर करू शकता. ही साल दातांवर घासल्यानं पिवळेपणा कमी होतो. 

२) लिंबू, संत्रा किंवा केळीची साले दातांवर घासल्यानं देखील दातांचा पिवळेपणा कमी होतो.

३) दातांवर पडलेले पिवळे डाग जाण्यासाठी बेकिंग सोडा आणि हायड्रोजन पेरोक्साइडची पेस्ट वापरणं फायद्याचं ठरेल. या पेस्टचा वापर केल्यामुळे दातांवर साचलेला प्लेक आणि बॅक्टेरियाची समस्या दूर होते.

४) सकाळी उठल्यानंतर एकदा आणि रात्री झोपण्यापूर्वी एकदा असे दिवसातून दोनदा किमान 2 मिनिटे ब्रश करा. यामुळे दात किडण्याचा धोका कमी होतो.

५) दातदुखी, हिरड्या सुजणे यासारख्या समस्यांपासून सुटका मिळावी, यासाठी पेरूच्या पानांपासून तयार केलेला काढा खूपच फायदेशीर आहे. पेरूच्या झाडाची दहा ते वीस पाने तोडून ती नीट स्वच्छ करा. त्यानंतर ही पाने एक लिटर पाण्यात टाका, व ते पाणी चांगले उकळवा. त्यानंतर तयार झालेला काढा गाळून घ्या, व त्याने दिवसातून पाच ते सहा वेळा गुळण्या करा.

६) दातांच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही सी- सॉल्टनं ब्रश करू शकता. असं करणे तुमचे तोंड स्वच्छ ठेवण्यासाठी खूप उपयुक्त आहे. सी-सॉल्टनं महिनाभर ब्रश केल्यास दातांची पिवळेपणा आणि दुर्गंधी यापासून सुटका होईल. तसेच ही समस्या पुन्हा उद्भवणाची शक्यताही खूप कमी होईल. सी-सॉल्टमध्ये कॅल्शियम पावडर टाकल्यास दातांमधून रक्त येण्याच्या समस्येपासून सुटका मिळेल.

दरम्यान, घरगुती उपाय केल्यानंतरही तुमच्या दातांवरील पिवळसरपणाचा थर कमी होत नसेल, तर अशावेळी तुम्ही डेंटिस्टकडे जाऊन सल्ला घेऊ शकता.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने